अलीकडेच झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका खेळली गेली. ज्यामध्ये भारताचा 2-0 ने पराभव झाला. पण आता वास्तविक त्याच मालिकेसंर्दभात मोठी बातमी समोर येत आहे. ते असे की, भारत-श्रीलंका वनडे मालिकेत पंचांची मोठी चूक समोर आली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघ 230 धावा करू शकले, ज्याला टाय घोषित करण्यात आले. पण आता एक मोठा खुलासा समोर आला आहे की, त्या सामन्यानंतर टायब्रेकर म्हणून सुपर ओव्हर घेण्यात येणार होती, मात्र अधिकाऱ्यांना त्या नियमांची माहिती नव्हती.
त्या सामन्याचे पंच जो विल्सन, रवींद्र विमलसिरी, सामनाधिकारी रंजन मदुगले, टीव्ही पंच आणि चौथ्या पंचांनी चूक झाल्याचे मान्य केले होते. एकदिवसीय सामन्यांचे नियम सांगतात की, टाय झाल्यास निकाल मिळविण्यासाठी सुपर ओव्हर घेण्यात येईल. पण या संदर्भात काही शंका होती की बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात सुपर ओव्हर आयोजित करण्याबाबत करार झाला होता की नाही?
एकीकडे सामना बरोबरीत सुटल्यानंतर पंचांनी बेल टाकून सामना संपल्याची खात्री केली, तर दुसरीकडे खेळाडूंनीही याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. हा सामना संपल्यानंतर लगेचच सुपर ओव्हर न झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयसीसीचा नवा नियम आहे की दोन्ही संघांचे डाव एकाच धावसंख्येवर संपले तर सुपर ओव्हर घेतली जाईल. सुपर ओव्हर देखील टाय राहिल्यास, सामन्याचा निकाल घोषित होईपर्यंत सुपर ओव्हर आयोजित केल्या जातील. जर सुपर ओव्हर खेळणे शक्य नसेल तर सामना टाय घोषित केला जाईल.
वास्तविक, एकदिवसीय मालिकेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारतीय फलंदाजी संघर्ष करताना दिसली. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना 32 धावांनी गमावला. त्याचवेळी तिसऱ्या सामन्याची वेळ आली तेव्हा भारतीय संघाची चांगलीच दमछाक झाली. कारण यावेळी भारताचा 110 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. गेल्या 27 वर्षांत श्रीलंकेने भारताला वनडे मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती.
हेही वाचा-
आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटणार? बीसीसीआय सचिव जय शहांची मोठी प्रतिक्रिया
काय सांगता.! आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांची चक्क इतक्या रुपयांची कमाई, पाहा सर्वात महागडा कोण?
भारतात विश्वचषक आयोजित करा; जय शहांनी या कारणास्तव फेटाळली विनंती; म्हणाले, आम्ही नाही…