टीम इंडियाचा प्रदीर्घ कसोटी हंगाम सुरू होण्यापूर्वी ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने चाहत्यांना एक आनंददायी भेट दिली आहे. हार्दिक गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ट्रेनिंगचे व्हिडिओ पोस्ट करत होता पण गुरुवारी (12 सप्टेंबर) त्याने अशा काही क्लिप शेअर केल्या. ज्या पाहून त्याच्या टेस्ट फॉरमॅटमध्ये परतण्याची आशा चाहत्यांच्या मनात पुन्हा जागृत झाली आहे. मायदेशात बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळल्यानंतर भारत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.
परदेशी भूमीवर टीम इंडियाला अशा अष्टपैलू खेळाडूची नितांत गरज असेल जो बाॅलसह आणि बॅटनेही योगदान देऊ शकेल. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये या प्रकारच्या भूमिकेसाठी हार्दिक योग्य आहे. पण त्याने स्वतःला कसोटी क्रिकेटपासून दूर ठेवले आहे. पण आता कदाचित तो पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. लाल चेंडूसह त्याच्या सराव सत्रातून याचे संकेत मिळाले आहेत.
हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही स्टोरी शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये तो लाल चेंडूने गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या इन्स्टा स्टोरीमध्ये तो त्याच्या पूर्ण रनअपसह गोलंदाजी करत असल्याचे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या पुन्हा एकदा रेड बॉलच्या फॉर्मेटमध्ये आपली जादू दाखवताना दिसणार आहे का, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. असे झाले तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा समतोल खूप मजबूत होऊ शकतो. कारण हार्दिकमध्ये चेंडूसोबतच बॅटनेही योगदान देण्याची क्षमता आहे.
Hardik Pandya in the practice session. 🔥 pic.twitter.com/JW5vkVLUZq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2024
हार्दिक पांड्याने 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याच्या फिटनेसशी संबंधित समस्यांमुळे तो फक्त मर्यादित षटकांचा फॉरमॅट खेळताना दिसला होता. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने 11 कसोटी सामन्यात बॅटने 532 धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत 17 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा-
आगामी काळात ‘रोहित-विराट’ची जागा हे दोन स्टार्स घेणार; पियुष चावलाचे मोठे वक्तव्य
बांग्लादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी टीम इंडिया चेन्नईत दाखल, सामन्यापूर्वी सराव सत्राचे आयोजन
IND VS BAN; टीम इंडियाचे हे तीन गोलंदाज बांग्लादेशविरुद्ध गेम चेंजर ठरणार