---Advertisement---

शुबमन गिलचं टी-20 वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न भंगलं, ‘या’ कारणामुळे संघातून पत्ता कट!

On: शनिवार, डिसेंबर 20, 2025 3:23 PM
---Advertisement---

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून भारतीय टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग आणि उपकर्णधार असलेला शुबमन गिलला (Shubman gill) 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही. गिलला संघातून बाहेर काढल्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे, परंतु त्याचे खराब प्रदर्शन हे यामागचे मुख्य कारण मानले जात आहे.

शुबमन गिलसाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन मालिका अत्यंत निराशाजनक ठरल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 5 सामन्यांत फक्त 132 धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांत केवळ 32 धावा केल्या आहेत. सलग फ्लॉप ठरत असल्यामुळे निवड समितीने त्याला डच्चू देण्याचा कडक निर्णय घेतला. गिल उपकर्णधार असल्यामुळे त्याला संघातून काढले जाणार नाही असा अंदाज होता, मात्र बीसीसीआयने (BCCI) गुणवत्तेला प्राधान्य देत घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे

शुभमन गिलचे शेवटचे 8 सामने (धावा):

14 डिसेंबर 2025 विरुद्ध दक्षिण आफ्रिका धर्मशाला- 28
11 डिसेंबर 2025 विरुद्ध दक्षिण आफ्रिका न्यू चंदीगड- 0
9 डिसेंबर 2025 विरुद्ध दक्षिण आफ्रिका कटक- 4
8 नोव्हेंबर 2025 विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन- 29*
6 नोव्हेंबर 2025 विरुद्ध ऑस्ट्रेलिया करारा- 46
2 नोव्हेंबर 2025 विरुद्ध ऑस्ट्रेलिया होबार्ट- 15
31 ऑक्टोबर 2025 विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्न- 5
29 ऑक्टोबर 2025 विरुद्ध ऑस्ट्रेलिया कॅनबेरा- 37*

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, ईशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---