भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर खूपच निराश दिसत होता. रोहित शर्माने सामन्यानंतर मीडियाशी खुलेपणाने संवाद साधला आहे. रोहितने टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबद्दलही बोलला आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या संघात सामील होऊ शकतो. शमी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार पुनरागमन केले असले तरी चाहते अजूनही त्याच्या राष्ट्रीय संघात पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मुद्द्यांवर रोहित शर्माने खुलेपणाने चर्चा केली आहे.
ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर रोहितने शमीच्या फिटनेसबद्दल सांगितले की शमीच्या गुडघ्याला पुन्हा सूज आली आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान शमीच्या गुडघ्याला सूज आल्याने कसोटी सामना खेळण्याच्या तयारीत अडथळा निर्माण झाल्याने शमीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. असे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही काळजीपूर्वक काम करू इच्छितो, जेणेकरून त्याला आणखी दुखापत किंवा वेदना होणार नाहीत.
रोहितने असेही सांगितले की संघाला शमी 100 टक्के पूर्णपणे फीट हवा आहे. आम्हाला त्याला घाईघाईने आणायचे नाही. रोहित म्हणाला की, आम्हाला शमीला पूर्णपणे तंदुरुस्त पाहायचे आहे. कारण त्याला बराच काळ लोटला आहे. आम्ही त्याच्यावर दबाव आणू इच्छित नाही. मॉनिटरिंग टीम त्याच्या फिटनेसकडे लक्ष देत असून, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ.
घोट्याच्या दुखापतीमुळे शमीवर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली होती आणि जवळपास वर्षभर तो खेळाबाहेर आहे. त्याने अलीकडेच रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीत बंगालसाठी पुनरागमन केले आणि आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही खेळत आहे. तो आज 9 डिसेंबरला चंदीगडविरुद्ध प्री-क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक आणि फिजिओ त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन गेले तर त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले जाईल. ॲडलेडमध्ये भारताच्या पराभवानंतर आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामना 1-1 असा बरोबरीत आहे.
हेही वाचा-
ROHIT SHARMA TALKING ABOUT THE RETURN OF SHAMI:
– Waiting for Shami show in BGT 🤞 pic.twitter.com/sIF6raXGcQ
— Johns. (@CricCrazyJohns) December 8, 2024
WTC 2025 फायनलच्या शर्यतीत हे चार संघ, जाणून घ्या भारतासह सर्व देशांचे समीकरण
एकाच दिवसात पराभवाची हॅट्ट्रिक! ऑस्ट्रेलियापासून दुबईपर्यंत टीम इंडियावर मोठी नामुष्की
टीम इंडियाचा नवा ‘सिक्सर किंग’! पदार्पणातच मोडला सेहवागचा मोठा रेकॉर्ड