Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय खेळाडूंनी बसमध्येच साजरी केली धूळवड! विराट म्हणाला, ‘बेबी काल्म डाऊन’, तर रोहितने…

March 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Mufaddal Vohra

Photo Courtesy: Twitter/Mufaddal Vohra


भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्याची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील अखेरचा सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी संपूर्ण भारतीय संघ अहमदाबाद येथे पोहोचला आहे. त्याचवेळी होळीचे औचित्य साधून भारतीय संघाने धमाल मजा केली. शुबमन गिल याने शुबमन गिलने आपल्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Virat Kohli and team India fully enjoying Holi. pic.twitter.com/XiognDen5G

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 7, 2023

 

अहमदाबाद येथे पोहोचल्यानंतर भारतीय संघाचे पहिले सराव सत्र मंगळवारी पार पडले. त्यानंतर भारतीय संघाने हॉटेलकडे जाताना थेट बसमध्येच होळी साजरी केली. त्यावेळी विराट हा बेबी काल्म डाऊन हे गाणे म्हणताना दिसला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील या व्हिडिओमध्ये रंग उधळताना दिसत आहे. त्याला श्रेयस अय्यर साथ देताना दिसतोय.

#TeamIndia wishes you all a very Happy Holi 🙌🙌#HappyHoli pic.twitter.com/RdcVrNpfoB

— BCCI (@BCCI) March 7, 2023

 

बसमध्ये होळी साजरी केल्यानंतर भारतीय संघाने ड्रेसिंग रूममध्ये देखील होळीचे सेलिब्रेशन केले. यामध्ये भारतीय संघाचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ दिसून येत आहे.

भारतीय संघाने या मालिकेतील पहिले दोन सामने आपल्या नावे केले होते. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पुनरागमन करत विजय संपादन केला होता. आता अखेरचा कसोटी सामना जिंकण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.  हा सामना जिंकल्यास भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. तसेच, कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी जाण्याची देखील भारतीय संघाला संधी असणार आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍंथनी अल्बानेस हे उपस्थिती लावतील.

(Team India Celebrate Holi In Team Bus And Dressing Room Ahead Ahmedabad Test Virat Kohli And Rohit Sharma Song)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत 


Next Post
Photo Courtesy: Instagram

ना ही सारा, ना ती सारा! शुबमनची क्रश आहे साऊथची हिरोईन? गिल म्हणतोय...

shoaib-akhtar

अख्तर पाहतोय दिवास्वप्न! म्हणाला, "मुंबईत पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवून विश्वचषक जिंकायला हवा"

Photo Courtesy: Twitter

युपी वॉरियर्झचा धक्कादायक निर्णय! मॅचविनर हॅरिसला बसवले बाकावर‌, चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143