---Advertisement---

टीम इंडियाला ऐतिहासिक ‘व्हाईट वॉश’ची संधी; बनू शकतो नवा विक्रम

On: रविवार, नोव्हेंबर 21, 2021 4:51 PM
india-t20-team
---Advertisement---

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. आयसीसी टी२० विश्वचषकात खराब कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत जोरदार पुनरागमन केले. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला आणि मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाकडे एक मोठी कामगिरी करण्याचे आव्हान असेल.

भारत करू शकतो अशी कामगिरी
तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडला सलग दोन द्विपक्षीय टी२० मालिकांमध्ये व्हाईट वॉश देणारा पहिला संघ होण्याचा मान भारतीय संघाला मिळवता येईल. भारतीय संघाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौर्‍यावर न्यूझीलंडला ५-० अशी मात दिली होती. या मालिकेतील पहिल्या चार सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली तर अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती.

दोन्ही संघांची समसमान कामगिरी
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान आत्तापर्यंत १९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी आठ सामन्यात भारताने तर नऊ सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. उर्वरित दोन सामने टाय झाल्यानंतर सुपर ओवरमध्ये भारतीय संघाने आपल्या नावे केले होते. द्विपक्षीय मालिकेत भारताने सरशी साधली असली तरी, टी२० विश्वचषकात भारताला न्यूझीलंडवर विजय मिळवता आला नाही.

तिसऱ्या सामन्यासाठी संभावित भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---