भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. उभय संघातील दुसरा सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होईल. मात्र, या सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे हॉटेल बदलण्यात आल्याची बातमी समोर येतेय.
नागपूर कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये दाखल झाला. भारतीय संघ दिल्लीमध्ये सामना असल्यानंतर प्रामुख्याने हॉटेल ताज पॅलेस अथवा आयटीसी मोरया या हॉटेलमध्ये थांबण्यास प्राधान्य देतो. मात्र, यावेळी बीसीसीआयने आपल्या संघाला तेथे थांबवले नाही. सध्या दिल्लीमध्ये जी टी20 समिट सुरू आहे. तसेच दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या लग्नाचा हंगाम असल्याने, या दोन्ही हॉटेलमध्ये लोकांची वर्दळ दिसून येते.
यामुळेच खेळाडूंना वेळ मिळणार नाही म्हणून बीसीसीआयने त्यांना यावेळी दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबवले आहे. सध्या भारतीय संघ नोएडा येथील हॉटेल लीला येथे वास्तव्यास असून, बोर्ड तेथील एकूण सुविधेबद्दल आनंदी असल्याचे समजते. विराट कोहली हा सध्या भारतीय संघासोबत नाही. तो गुरुग्राम येथे आपल्या घरी वास्तव्यास असून, त्यासाठी त्याला संघ व्यवस्थापनाने खास परवानगी दिली आहे. तो 16 फेब्रुवारी रोजी संघात सामील होईल.
दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकेल. भारताने नागपूर येथील पहिला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात आपल्या नावे केला होता.
दिल्ली कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
(Team India Change Hotel In Delhi Virat Stay At His Own House)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
पहिल्या आयपीएल विजेतेपदासाठी आरसीबीने कसली कंबर, दोन वेळचे BBL विजेते प्रशिक्षक संघात सामील