---Advertisement---

अन्य संघांचे शतकही पूर्ण नसताना विराट कोहलीच्या टीम इंडियाचे द्विशतक पूर्ण!

On: सोमवार, ऑक्टोबर 14, 2019 7:39 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरु असलेली 3 सामन्यांची कसोटी मालिका ही आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपचा देखील भाग आहे. त्यामुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 200 गुणांचा टप्पा गाठला आहे.

भारताला दुसऱ्या कसोटीत 1 डाव 137 धावांनी विजय मिळवल्यानंतर कसोटी चॅम्पियनशीपचे 40 गुण मिळाले. भारताने आत्तापर्यंत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये 4 सामने खेळले असून एकही सामना गमावलेला नाही.

मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध दोन्ही कसोटी सामन्यात पराभव स्विकारल्याने त्यांच्या खात्यात शून्य गुण आहेत.

तसेच सध्या भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत 200 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंड आणि श्रीलंकेपेक्षा तब्बल 140 गुणांनी पुणे आहे. या गुणतालिकेत प्रत्येकी 2 सामन्यांनंतर 60 गुणांसह न्यूझीलंड आणि श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तसेच त्यांच्या पाठोपाठ 5 सामन्यांच्या ऍशेस मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रत्येकी 56 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

त्याचबरोबर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात शून्य गुण आहेत. तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या अजून कसोटी चॅम्पियनशिपच्या सामन्यांना सुरुवात झालेली नाही.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटीनंतर कसोटी चॅम्पियशीपची गुणतालिका-

Screengrab: icc-cricket.com

असे दिले जातात कसोटी चॅम्पियनशीपमध्ये गुण – 

ही चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात पार पडणार आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा समावेश आहे.

तसेच 9 संघांना प्रत्येकी 8 प्रतिस्पर्ध्यांपैकी 6 संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशात खेळायच्या आहेत. या मालिका 2 ते 5 सामन्यांच्या असतील.

या चॅम्पियशीपमध्ये होणाऱ्या प्रत्येक मालिकेसाठी एकूण 120 गुण असतील. म्हणजेच जर दोन सामन्यांची मालिका असेल तर या मालिकेतील एक सामना जिंकणाऱ्या संघाला 60 गुण मिळतील.

पण सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी 20 गुण आणि जर बरोबरी झाली तर दोन्ही संघाला प्रत्येकी 30 गुण दिले जातील. पराभूत होणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही

जर मालिका 3 सामन्यांची झाली तर एका सामन्यात जिंकणारा संघ 40 गुण मिळवेल. तर अनिर्णित झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण आणि बरोबरी झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20 गुण दिले जातील.

या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये साखळी फेरीनंतर ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील या दोन संघात जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर अंतिम सामना पार पडेल.

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये असे मिळणार गुण – 

Screengrab: icc-cricket.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---