यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय टी२० संघात पुनरागमन केले आहे. त्याला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात सामील केले आहे. अशात कार्तिकने पाकिस्तानी क्रिकेट संघाचा तिन्ही क्रिकेट प्रकारातील कर्णधार बाबर आझम याची प्रशंसा केली आहे. कार्तिक बाबरबद्दल नेमका काय म्हणाला आहे, चला जाणून घेऊया.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) म्हणाला की, पाकिस्तानचा हा युवा फलंदाज तिन्ही क्रिकेट प्रकारात अव्वल बनण्याची ताकद राखतो. माध्यमांशी बोलताना कार्तिक म्हणाला की, “बाबर आझम एक चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडे चांगले कौशल्य आहेत. संघात ज्याप्रकारची गरज आहे, तो स्वत:ला त्या फॉर्ममध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो.” पुढे बोलताना तो असेही म्हणाला की, “तो खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार आहे आणि त्याने विविध फलंदाजी पोझिशनमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या भविष्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो.”
बाबर आझमची क्रिकेट कारकीर्द
बाबर आझम (Babar Azam) याने पाकिस्तानकडून खेळताना आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ८६ वनडे सामने आणि ७४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने ७१ डावात फलंदाजी करताना ४५.९८च्या सरासरीने २८५१ धावा चोपल्या आहेत. कसोटीत त्याने ६ शतके आणि २१ अर्धशतक झळकावली आहेत. तसेच, वनडेत ५९.१८च्या सरासरीने ४२६१ धावा करताना १६ शतके आणि १८ अर्धशतके मारली आहेत. याव्यतिरिक्त टी२०त ४५.५२च्या सरासरीने २६८६ धावा केल्या आहेत. त्याने टी२०त १ शतक आणि २६ अर्धशतके चोपली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशेन सध्या कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, पण ‘बिग फोर’मध्ये तो लवकरच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, इंग्लंडचा जो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांच्या ‘बिग फोर’मध्ये सामील होऊ शकतो. तो सध्या आयसीसी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे.
कार्तिकबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आयपीएल २०२२मध्ये क्वालिफायर २ सामन्यात जागा बनवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याला विश्वास आहे की, पाकिस्तानचा कर्णधार लवकरच आयसीसी कसोटी फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी राहील.
नुकतेच मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी कार्तिकची भारतीय संघात निवड झाली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.
महा स्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एलिमिनेटर सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आरसीबीच्या दिनेश कार्तिकला दंड, कारण गुलदस्त्यात
‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र
संजू सॅमसनला बेंगलोरच्या ‘या’ दोन गोलंदाजांपासून राहावं लागेल सावध, बनू शकतात राजस्थानचा काळ