भारतीय क्रिकेट संघ सध्या विजयरथावर स्वार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी अशा वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आला आहे. रविवारी (२४ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्धचा सलग दुसरा वनडे सामना जिंकत भारतीय संघाने मालिकाही आपल्या नावावर केली आहे. हा भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध सलग १२ वा वनडे मालिका विजय आहे. मात्र या विजयाच्या आनंदावर पाणी फेरणारे वृत्त पुढे आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी, ICC) ने भारतीय संघावर षटकांची गती कमी राखण्यासाठी (Slow Over Rate) दंड ठोठावला आहे. हा दंड (Team India Fined) पहिल्या वनडे सामन्यातील (First ODI) षटकांची गती कमी राखण्यासाठी लावण्यात आला आहे. भारतीय संघावर सामना शुल्काच्या २० टक्के दंड लावण्यात आहे.
सामना रेफरी रिची रिचर्डसन यांनी भारतीय संघाने पहिल्या वनडेत निर्धारित वेळेपेक्षा १ षटक कमी टाकले असल्याचे सांगत दंड ठोठावला आहे. आयसीसीने याबद्दल माहिती देताना सांगितले की, आचारसंहितेच्या नियम २.२२ नुसार भारतीय खेळाडूंना निर्धारित वेळेपक्षा एक षटक कमी टाकल्याने सामना शुल्काच्या २० टक्के दंड लावण्यात येत आहे.
तसेच आयसीसीने हेही सांगितले की, भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवनने त्याची चूक स्विकारली आहे. त्यामुळे कोणतीही अधिकृत कारवाई करण्याची गरज भासली नाही. हा आरोप मैदानी पंच जोए विलसन आणि लेसली रीफर, तिसरे पंच ग्रेगरी ब्रेथवेट व चौथे पंच नायजेल डुगुइड यांनी केला होता.
A slow over rate in the first ODI against West Indies in Port of Spain has seen India cop a fine. #WIvIND | Details 👇 https://t.co/a3sZLuZJT7
— ICC (@ICC) July 24, 2022
दरम्यान भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये येऊन वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली आहे. केवळ ३ धावांच्या फरकाने पहिला वनडे सामना जिंकत पाहुण्या भारताने वनडे मालिकेची दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या वनडे सामन्यात २ विकेट्सने त्यांनी विजय मिळवला आहे. अशाप्रकारे ३ सामन्यांची वनडे मालिका २-० ने जिंकली आहे. आता तिसरा आणि अखेरचा वनडे सामना २७ जुलै रोजी होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजला झुकवत भारताने मिळवला ‘नंबर १’चा ताज, खास विश्वविक्रमात पाकिस्तानला टाकले मागे
थरारक विजयासह वनडे मालिका टीम इंडियाच्या नावे; संजू-अक्षर ठरले विजयाचे शिल्पकार