भारतीय क्रिकेट संघ या महिन्याच्या आखेरीस श्रीलंका दाैरा करणार आहे. ज्यामध्ये टीम इंडियाला 3 टी20 आणि तेवढेच एकदिवसीय सामने खेळायचे आहे. बीसीसीआयने या दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आले आहे. पण या दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाचे स्टार फलंदाज अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड या दोन्ही फलंदाजांना संघात स्थान देण्यात आले नाही. ज्यांनी झिम्बाब्वे दाैऱ्यावर शानदार कामगिरी केले होते. आता माजी भारतीय क्रिकेटर एस बद्रीनाथने या युवा खेळाडूंसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी अनोखा सल्ला दिला आहे.
श्रीलंका दाैऱ्यासाठी वनडे आणि टी20 मालिकेसाठी युवा फलंदाज रियान परागला संधी देण्यात आले आहे. तर या आधी झिम्बाब्वे दाैऱ्यावर रियान परागने काही विशेष कामगिरी केली नव्हती. झिम्बाब्वे दाैऱ्यावर रियान परागने आंतरराष्ट्रीय करिअरला पदार्पण केले होते. आता एस बद्रीनाथ यांनी संताप व्यक्त केला आणि म्हटले की तरुण खेळाडूंनी चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असले पाहिजे. याशिवाय संघात निवड होण्यासाठी त्यांच्याकडे चांगला पीआर मॅनेजर असावा.
‘क्रिक डिबेट विथ बद्री’ या विषयावर बोलताना एस बद्रीनाथ म्हणाले, “कधीकधी रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड आणि इतर खेळाडूंची भारतीय संघात निवड होत नसताना तुम्हाला वाईट माणसाच्या प्रतिमेची गरज भासते. असे वाटते की तुम्हाला संघात असणे आवश्यक आहे. बॉलीवूड अभिनेत्रीशी संबंध, एक चांगला मीडिया मॅनेजर आणि शरीरावर टॅटू आवश्यक आहेत.
वास्तविक, ऋतुराज गायकवाडने झिम्बाब्वे विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेच्या 3 सामन्यांमध्ये फलंदाजी केला होता. ज्यामध्ये त्याने 7,77 आणि 49 धावा केल्या होत्या. तर अभिषेक शर्माने 4 सामन्यात फलंदाजी करताना 124 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये शतकी खेळीचा सामवेश आहे.
भारतीय संघ 27 जुलै पासून श्रीलंका दाैऱ्याल सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचे हेड कोच गाैतम गंभीरच्या कार्यकाळाला या मालिकेपासून सुरुवात होणार आहे. तर टी20 विश्वचषक 2024 च्या ब्रेकनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा आगामी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा पहायला मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहली-रोहित नाही तर, हे दोन खेळाडू स्मृती मंधानाचे आवडते क्रिकेटर
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फिरकीपटू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर…
रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सची सोडणार साथ! अहवालात धक्कादायक खुलासा