भारतीय क्रिकेट संघाला ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेसोबत मायदेशात टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेदरम्यान संघातील अनेक वरिष्ठांना विश्रांती दिली गेली आहे. पण ऐनवेळी संघात एक बदल झाला आहे. कमलेश जैन भारतीय संघाचे नवीन फिजिओ म्हणून रुजू झाले आहेत. भारतीय संघाच्या आधीच्या फिजिओंवर आता बीसीसीआयने नवीन जबाबदारी दिली आहे.
भारतीय संघासोबत मागच्या मोठ्या काळापासून कार्यरत असलेले मुख्य फिजिओ नितीन पटेल (Nitin Patel) आता राष्ट्रीय क्रिकेट आकामदीत (एनसीए) कार्यरत आहेत. आयपीएलपूर्वीच माहिती मिळाली होती की, नितीन पटेल यांना एनसीएमध्ये फिजिओची जबाबदारी दिली गेली होती. अशात आता पटेल यांच्या अनुपस्थितीत संघाला कमलेश जैन (Kamlesh Jain) यांच्या रूपाने नवीन फिजिओ मिळाले आहेत. माहितीनुसार कमलेश जैन यापूर्वी आयपीएल फ्रँचायजी कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिले आहेत. नितीन पटेल यांची एनसीएसमध्ये रवानगी केल्यानंतर बीसीसीआयने जैन यांना भारतीय संघासाठी नियुक्त केले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार जैन सोमवारी (६ जून) भारतीय संघासोबत जोडले गेले. संघ सध्या दिल्लीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी सराव करत आहे. सोमवारी केएल राहुलच्या नेतृत्वात संघातील खेळाडूंनी स्टेडियममध्ये जवळपास तीन तास सराव केला आणि त्यावेळी जैन देखील त्याठिकाणी उपस्थित होते. टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ जूनला दिल्लीत खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना १२ जूनला कटकमध्ये, तिसरा सामना १४ जूनला विजागमध्ये, चौथा सामना १७ जूनला राजकोटमध्ये, तर शेवटचा सामना १९ जून रोजी बेंगलोरमध्ये खेळला जाईल.
दरम्यान, बीसीसीआय सध्या संघात सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष्य ठेवून आहे. आयपीएल २०२२ मध्ये खेळाडू दोन महिने निरंतर क्रिकेट खेळले आहेत आणि लगेच त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी सर्वजण एनसीएध्ये एकत्र जमले होते आणि त्याठिकाणी त्यांची फिटनेस टेस्ट घेतली गेली होती. दक्षिण आफ्रिकी संघासोबतची मालिका संपल्यानंतर भारताला आयर्लंड आणि इंग्लंड दौरा करायचा आहे. अशात खेळाडू फिट राहणे गरजेचे आहे. जैन यांच्या खांद्यावार आता ही जबाबदारी असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अश्विनला पछाडत चहल बनणार टी२० क्रिकेटचा किंग! नंबर १ बनण्यापासून फक्त इतक्या विकेट्सने दूर
मुंबई इंडियन्सला मिळणार भावी संघमालकीण? मुकेश-नीता अंबानींची होणारी सूनबाई चर्चेत, वाचा तिच्याबद्दल