---Advertisement---

शंभरावा सामना खेळणाऱ्या इशांत शर्माचे टीम इंडियाने ‘असे’ केले मैदानात स्वागत, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, फेब्रुवारी 24, 2021 8:15 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा दिवस – रात्र सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा) खेळवण्यात येत आहे. तसेच या सामन्यात देखील प्रेक्षकांना लाइव्ह सामना पाहण्याची संधी देण्यात आली आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना भारतीय संघाचा जलद गोलंदाज ईशांत शर्मासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे.

ईशांत शर्मा आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १०० सामने खेळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. अशातच कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ईशांत शर्माला १०० वा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

सामना सुरू होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील इशांतला या महत्वाच्या क्षणी शुभेच्छा दिल्या आणि स्मृतिचिन्ह देखील दिले. त्यानंतर विराट कोहली आणि संघाने त्याला मैदानात जाताना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला होता. यावेळी दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या भारतीय खेळाडूंनी त्यांच्या मधून मैदानात जाणाऱ्या ईशांत शर्माला १०० व्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://twitter.com/bhushankilledar/status/1364523628365160450

ईशांतने १०० कसोटी सामना खेळताना एका बाबतीत दिग्गज खेळाडूची बरोबरी केली आहे. कपिल देव यांनी देखील आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात संघासाठी पहीली विकेट पटकावली होती. आज ईशांत शर्माने देखील गोलंदाजी करताना सुरुवातीच्या षटकात इंग्लंडचा सलामीवीर डोम सिब्ली याला बाद करत भारतीय संघासाठी पहिली विकेट पटकावली आहे.

https://twitter.com/ICC/status/1364505003746942977

गेल्या काही वर्षात इशांतने आपल्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. त्याने आपल्या पहिल्या ७८ सामन्यात २२६ गडी बाद केले होते आणि मागच्या २० सामन्यात त्याला ७६ गडी बाद करण्यात यश आले आहे. तो खूप वेळ संघाबाहेर होता.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय महिला संघ मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज; ‘या’ संघाविरुद्ध मायदेशात खेळणार मालिका

डे-नाईट टेस्टचा पहिलाच दिवस अक्षर पटेलने गाजवला! ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवले पहिले स्थान

द्विशतक आणि २४ फेब्रुवारीचा आहे ‘याराना’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---