भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा शेवटचा दिवस आज म्हणजेच मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी खेळला जात आहे. सामन्याच्या चाैथा दिवस संपेपर्यंत बांग्लादेश 26-2 अश्या स्थितीत होता. आज पाचव्या दिवसाच्या खेळात बांग्लादेश 146 धावाच जोडू शकला. ज्यामध्ये सलामीवीर फलंदाज शादमान इस्लामने सर्वाधिक 50 धावा केल्या. दरम्यान टीम इंडिया समोर आता मालिकेत बांग्लादेशला क्लीन स्वीप करण्यासाठी 95 धावांचे लक्ष्य आहे.
बांग्लादेश संघ दुसऱ्या डावात 146 धावांत ऑल आऊट झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या तीन दिवसात केवळ 35 षटके खेळली गेली. अशा स्थितीत सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात होते. मात्र चौथ्या दिवशी अतिशय रोमांचक सामना झाला. त्यामुळे सामना विजयाने संपुष्टात येईल असे दिसते. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 285/9 धावांवर डाव घोषित केला. बांगलादेशने दुसऱ्या डावात 26 धावांत 2 विकेट गमावल्या आहेत. पाचव्या दिवशी बांग्लादेशने 8 विकेट्स गमावून केवळ 146 धावा केल्या.
INDIA NEED 95 RUNS TO WIN THE TEST SERIES 2-0. 🇮🇳 pic.twitter.com/vKSfBOqnnt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 1, 2024
टीम इंडियाच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने बांग्लादेश संघाचे कंबरडे मोडले. तर चाैथ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत अश्विनने संघाला दोन धक्के दिले होते. आजदेखील पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजी युनीट समोर बांग्लादेश संघाकडे कोणतेही उत्तर नव्हते. दुसऱ्या डावात संघ केवळ 146 धावापर्यंत पोहचू शकला. रवींद्र जडेजा अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. आशाप्रकारे टीम इंडियाला 2-0 ने मालिका जिंकण्यासाठी 95 धावांचे लक्ष्य आहे.
हेही वाचा-
13 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज
“ज्याने 9000 धावा केल्या…”, सुनील गावस्कर भारतीय संघाच्या रणनीतीवर संतापले
अभिषेकसोबत रिंकू सिंग ओपनिंग करणार! टी20 साठी माजी क्रिकेटपटूचा मास्टर प्लॅन