---Advertisement---

टीम इंडिया विजयीरथावर आरुढ! सलग १२ वा टी२० सामना जिंकत ‘या’ दोन संघांची विश्वविक्रमात बरोबरी

Team-India
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 Series) यांच्यात नुकत्याच खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत भारताने विजय मिळवला. मालिकेतील तीन सामन्यांपैकी तिन्ही सामने भारताने जिंकले आणि श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा खेळाडूंची भरमार पाहायला मिळाली, जे विश्वासास पात्र ठरले. परिणामी भारतीय संघाने विरोधी श्रीलंकेला धूळ चारली. मालिकेतील शेवटच्या सामना भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला आणि एक मोठा विक्रमही केला.

भारतीय संघा सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वात विजयी रथावर आरुढ आहे. रोहितच्या नेतृत्वात भारताने मागच्या तीन टी-२० मालिकांमध्ये विरोधी संघाला क्लीन स्वीप दिला आहे. श्रीलंकेलाही भारताकडून क्लीन स्वीप मिळाला. श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा टी-२० सामना जिंकून भारतीय संघाने सलग १२ वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सामने लागोपाठ जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने लागोपाठ जिंकण्याच्या बाबतीत तीन संघ सध्या एकाच पातळीवर आहे. तिन्ही संघांनी प्रत्येकी १२ टी-२० सामने लागोपाठ जिंकले आहेत, जी सर्वोत्तम कामगिरी आहे. यामध्ये भारत, अफगाणिस्तान आणि रोमानिया या संघांचा समावेश आहे.

भारताचा या यादीत नव्याने समावेश झाला असून संघाला स्वतःचा हा विक्रम अजून मोठा करण्याची संधी आहे. आगामी काळातील टी-२० सामन्यांमध्ये जर भारत पराभूत झाला नाही आणि विजयी रथ कायम ठेवला, तर भारतीय संघ अफगाणिस्तान आणि रोमानिया संघाला मागे टाकून या यादीत पहिल्या क्रमांकावर येईल. अशात भारतीय संघाच्या आगामी टी-२० सामन्यावर लक्ष असेल.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेचा विचार केला, तर भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. पहिल्या सामन्यात भारताने ६२ धावांनी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने, तर तिसऱ्या सामन्यात ६ विकेट्स राखून भारताने विजय मिळवला. टी-२० मालिकेत सोपा विजय मिळवल्यानंतर भारताला ४ मार्चपासून श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळायचा आहे, तर दुसरा कसोटी सामना ११ मार्चपासून सुरू होईल.

महत्वाच्या बातम्या –

शाहीन आफ्रिदी कर्णधार म्हणूनही चमकला! आपल्या संघाला पीएसएलचे विजेतेपद जिंकून देत स्मिथ, रोहितला पछाडलं

रोहित कर्णधाराच्या रुपात सुपरहिट, पण फलंदाज म्हणून केलाय ‘हा’ नकोसा विक्रम

भारताने आठव्यांदा दिला प्रतिस्पर्धांना टी२० मालिकेत व्हाईटवॉश, ‘या’ कर्णधारांनी केलाय कारनामा 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---