खो खो विश्वचषक 2025: खो खो विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात पेरूचा 70-38 च्या मोठ्या फरकाने पराभव केला. भारतीय पुरुष संघानंतर आता महिला संघानेही सलग दुसरा विजय नोंदवला आहे. टीम इंडियाच्या सर्व पुरुष खेळाडूंनी अटॅक आणि डिफेंस जोरदार कामगिरी केली. प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यातही सर्वोत्तम कामगिरी केली आणि पेरुव्हियन संघाचा पराभव केला. संघाला कुठेही पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली नाही.
भारतीय पुरुष संघ आणि पेरू संघ यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्याच्या स्कोअरकार्डवर एक नजर टाकली तर, टाॅस जिंकून प्रतिक वायकरने अटॅक करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात अटॅक करत 36 गुणांची कमाई केली होती. तर पेरूला एकही डिफेंस गुण दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात बचावात्मक खेळताना पेरूच्या खेळाडूंना चांगलेच थकवले. खेळाडूंना बाद करण्यासाठी पेरूच्या खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागला. पण इतकी मेहनत करूनही पेरूला फक्त 16 गुण मिळवता आले. त्यामुळे दुसर्या डावाअखेर भारताकडे 20 गुणांची आघाडी होती. तिसऱ्या डावात टीम इंडियाने पुन्हा शानदार अटॅक केला. या डावात टीम इंडियाने 34 गुणांची कमाई केली. त्यामुळे भारताकडे 54 गुण होते. शेवटच्या सात मिनिटात हा फरक कमी करणे काही पेरूला जमणारे नव्हते. पेरुने शेवटच्या सत्रात 22 गुण मिळवले आणि भारताचा 32 गुणांनी विजय झाला.
#TeamIndia makes it 3 in 3! 💪🇮🇳
Another dominant win with a 70-38 finish over Peru! 🔥#KhoKho #KKWC2025 #KhoKhoWorldCup #KKWCMen #TheWorldGoesKho
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 15, 2025
भारतीय पुरुष संघाचा चौथा आणि शेवटचा गट सामना 16 जानेवारी, गुरुवारी भूटानविरुद्ध होईल. प्रतीक वायकरची टीम इंडिया ही मॅच जिंकून क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान पक्के करू इच्छिते. भारतीय पुरुष संघ अ गटात आहे. भारताव्यतिरिक्त, या गटात नेपाळ, ब्राझील, पेरू आणि भूतानसह एकूण 5 संघांचा समावेश आहे. अव्वल 2 संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.
हेही वाचा-
संघाला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर पडला ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज
Champions Trophy; भारतीय संघाच्या घोषणेसाठी एवढा वेळ का? माजी क्रिकेटपटूने साधला निशाना
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट