भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गंभीरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. यानंतर गंभीरची सर्वत्र चर्चा होत आहे. गंभीरने राहुल द्रविडच्या जागी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या पाकीस्तानी खेळाडूच्यासोबत गंभीरचे नेहमीच वाद होते. मैदानावर गंभीरचा आक्रमक फॉर्म पाहिला. जर हमखास पाकिस्तानच्या विरोधात असेल तर त्यांच्यात शाब्दिक युद्ध नक्कीच झाले.गंभीरची आक्रमक बाजू मैदानावर अनेकदा पाहायला मिळाली. सामना पाकिस्तान विरुद्ध असेल तर एकप्रकारे शाब्दिक युद्ध होणारच हे निश्चित होते.
भारत-पाकिस्तान मॅचमध्ये शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यात अनेकदा जोरदार वादावादी झाली. अनेक वेळा परिस्थिती इतकी वाढली की मैदानावर उपस्थित पंचांना हस्तक्षेप करावा लागला. आफ्रिदीने काही महिन्यांपूर्वी गंभीरसोबत झालेल्या भांडणाबद्दल सांगितले होते. आता मोठा खुलासा झाला आहे
2007 मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात जोरदार वाद झाला होता. या सामन्यात गंभीर धाव घेण्यासाठी धावत असताना आफ्रिदी त्याच्या वाटेवर आला. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण इतके वाढले की मैदानावर उपस्थित पंचांना दोघांना वेगळे करावे लागले.
त्यानंतर 2009 च्या वनडे सामन्यात गंभीर आणि आफ्रिदीमध्ये जोरदार वाद झाला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा एकदिवसीय सामना कानपूरमध्ये खेळला गेला.
‘समा टीव्ही’वर बोलत असताना आफ्रिदीला त्याच्या आणि गंभीरच्या भांडणावर प्रश्न विचारण्यात आला. आफ्रिदी यांनी उत्तर दिले, “ही 2005-06 ची गोष्ट आहे. याबद्दल खूप चर्चा झाली आहे. या गोष्टी घडतात. त्याला भारताने जिंकावे असे वाटत होते, मी पाकिस्तानसाठी लढत होतो. अशा घटना घडतात. महत्त्वाच्या गोष्टी मैदानाबाहेर घडतात. फार मोठी गोष्ट नाही, पण ती व्यक्ती विसरते आणि पुढे जाते.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 क्रमवारीत ऋतुराज गायकवाडची मोठी झेप, शतकवीर अभिषेक शर्माचीही धमाकेदार एंट्री
गाैतम गंभीरला मिळणार राहुल द्रविडपेक्षा जास्त पगार? जाणून घ्या, किती असणार फरक
श्रेयस अय्यर संघात नाही, तर गंभीर कोणाला बनवणार भारताचा टी20 कर्णधार? या खेळाडूचं नाव आघाडीवर