---Advertisement---

‘रोहित-बुमराह’ नाही तर हा खरा क्रिकेटचा ‘शहेनशाह’, गाैतम गंभीरचे लक्षवेधी वक्तव्य

On: गुरूवार, सप्टेंबर 12, 2024 7:34 AM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि गौतम गंभीर यांना नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. या दोघांना भारतीय क्रिकेट संघातील ‘शहेनशाह’ आणि ‘बादशाह’ संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. दिल्ली प्रीमियर लीग (DPL) दरम्यान विचारलेल्या प्रश्नात गौतम गंभीरने विराट कोहलीला क्रिकेटचा सम्राट म्हटले आहे. विराट भारतीय संघात नवीन असताना गंभीरने त्याला खूप साथ दिली. एकदा तर त्याने आपला सामनावीराचा पुरस्कार कोहलीला दिला होता.

एकीकडे गौतम गंभीरने विराट कोहलीला ‘शहेनशाह’ म्हटले तर दुसरीकडे युवराज सिंगला क्रिकेटचा बादशाह म्हणून निवडले. याशिवाय त्याने सौरव गांगुलीला ‘टायगर’ आणि टीम इंडियाचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहला ‘प्लेयर’ ही पदवी दिली. सर्वात मजेशीर म्हणजे गौतम गंभीरने स्वत:ला ‘अँग्री यंग मॅन’ ही उपाधी दिली.

दुसरीकडे शिखर धवनलाही असेच प्रश्न विचारण्यात आले, मात्र त्याची उत्तरे गंभीरपेक्षा वेगळी होती. त्याने प्रथम विराट कोहलीला क्रिकेटचा बादशाह म्हटले आणि त्यालाच ‘अँग्री यंग मॅन’ देखील म्हटले. टीम इंडियाचा गब्बर असलेल्या धवनने हार्दिक पांड्याला ‘दबंग’ आणि जसप्रीत बुमराहला ‘शहेनशाह’ ही पदवी दिली. त्याने शुबमन गिलला ‘खेळाडू’ आणि सचिन तेंडुलकरला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटले.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असल्याने गौतम गंभीरसाठी पुढील काही महिने खूप कठीण जाणार आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला नुकतीच श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका गमवावी लागली होती. आता भारतासमोर एक, दोन नव्हे तर तीन कसोटी मालिकेचे आव्हान आहे. प्रथम टीम इंडियाला बांग्लादेशविरुद्ध दोन कसोटी सामने, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामने खेळायचे आहेत. वर्षअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर ट्रॉफीही अत्यंत महत्त्वाची मालिका असेल.

हेही वाचा-

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी खळबळ, ‘या’ दिग्गजाने दिला पदाचा राजीनामा
महिला टी20 अंडर-19 आशिया कप सुरू होणार, जय शाहांची मोठी घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---