भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत भारताला पहिला सामना जिंकण्यात यश आले. परंतू वेस्ट इंडीज संघाने भारताला दुसऱ्या सामन्यात चांगलेच प्रत्युत्तर दिले. वेस्ट इंडीज संघाने भारताला 6 विकेट्स राखून पराभूत केले. विंडीजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 40.5 षटकांत 181 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. याच कारणाने भारतीय संघाला पराभव स्वीकारावा” लागला, असे म्हटले जात आहे. या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने माध्यमांशी बोलताना विराट आणि रोहितला विश्रांती का दिली, याबाबत माहिती दिली.
वेस्ट इंडीजने पराभूत केल्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “या सामन्यादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat kohli) यांना विश्रांंती देण्यात आली. याचे मुख्य कारण हे आशिया चषक आणि विश्वचषक आहे. या मोठ्या स्पर्धा आहेत आणि या स्पर्धांपूर्वी आम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. कारण, भारतीय संघाचे अनेक प्रमुख खेळाडू हे दुखापतीतून बाहेर पडत आहेत. ते आता एनसीएमध्ये सराव करत आहे. पण ते कधीपर्यंत बरे होतील हे सांगणे कठीण आहे. या कारणाने इतर खेळाडूंना वाईट परिस्थितीत खेळण्याचा अनुभव असावा. संघाच्या वाईट परिस्थितीत त्यांना आपले योगदान देता यावे.”
द्रविडचा हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1685436585997721600?s=20
सामन्याचा आढावा
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना ईशान किशनने (Ishan Kishan) संघासाठी सर्वाधिक 55 चेंडूत 55 धावा केल्या, तर शुबमन गिलने (Shubman Gill) 49 चेंडूत 34 धावा करत पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली. मात्र, त्यानंतर कोणत्याही फलंदाजाने संघाच्या धावात जास्त वाढ केली नाही. परिणामी भारतीय संघ 40.5 षटकांत 181 धावांवर सर्वबाद झाला.
भारताच्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने 91 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये काईल मेयर्स (28 चेंडूत 36), ब्रेंडन किंग (23 चेंडूत 15), एलिक अथानाझे (9 चेंडूत 6) आणि शिमरॉन हेटमायर (15 चेंडूत 9) यांनी योगदान दिले होते. यानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार शाय होपने 80 चेंडूत नाबाद 63 धावांची खेळी साकारली, तर कीसी कार्टी याने 65 चेंडूत 48 धावा करून नाबाद राहिला. यांच्या खेळीमुळे विंडीजने सामना 6 विकेट्सने जिंकला. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने 8 षटके टाकून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. (team india head coach rahul dravid speak about rohit sharma and virat kohli )
महत्वाच्या बातम्या:
‘Ashes’ इतिहासातील सर्वात मोठा विक्रम Ben Stokesच्या नावावर, 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड केला उद्ध्वस्त
तब्बल 25 हजार धावा करणाऱ्या विराटवर आली ‘वॉटर बॉय’ बनण्याची वेळ, तरीही जिंकली कोट्यवधी मने- Video






