ऍशेस 2023मधील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना लंडन येथे खेळला जात आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी 9 विकेट्स गमावत 389 धावा केल्या आहेत. यावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या विक्रमात इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याचाही विक्रम मोडीत काढला आहे.
बेन स्टोक्सचा विक्रम
इंग्लंड संघाकडून खेळताना बेन स्टोक्स (Ben Stokes) याने खास विक्रम नावावर केला. पाचव्या कसोटीत स्टोक्सने झंझावाती खेळी साकारली. त्याने या खेळीत जरी 42 धावा केल्या असल्या, तरीही ऍशेस कसोटीच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम स्टोक्सने रचला आहे. स्टोक्स ऍशेस मालिकेत सर्वाधिक 15 षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.
स्टोक्सची ऍशेसमध्ये धमाल
खरं तर, 42 धावा करताच बेन स्टोक्स ऍशेस मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला. ऍशेस मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार आता स्टोक्सच्या नावावार झाले आहेत. स्टोक्सने ऍशेस इतिहासात सर्वाधिक 15 षटकार मारून इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen) याचा जुना विक्रम उद्ध्वस्त केला आहे. पीटरसनने 2005मध्ये ऍशेस मालिकेत 14 षटकार मारले होते.
ऍशेस मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारे इंग्लंडचे फलंदा
15 – बेन स्टोक्स, 2023*
14 – केविन पीटरसन, 2005
13 – बेन स्टोक्स, 2019
11 – अँड्र्यू फ्लिंटॉफ, 2005
स्टोक्स याने वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर याच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. हेटमायर एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. कारण, त्यााने 2018-19 मालिकेत बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक 15 षटकार मारले होते. या यादीत अव्वलस्थानी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून त्याने 2019-20मध्ये मायदेशातील कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 षटकार मारले होते.
पाचव्या कसोटीचा तिसरा दिवस
पाचव्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात 9 विकेट्स गमावत 389 धावा केल्या आहेत. इंग्लंड संघाला पहिल्या डावात फक्त 283 धावा करण्यात यश आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 295 धावा केल्या होत्या. तसेच, त्यांनी 12 धावांची आघाडीही घेतली होती. मात्र, आता दुसऱ्या डावात इंग्लंडकडे 377 धावांची आगाडी झाली आहे. सध्या स्टुअर्ट ब्रॉड 2 धावा आणि जेम्स अँडरसन 8 धावांवर नाबाद आहेत. (ashes 2023 5th test ben stokes broke kevin pietersen record to achieve most number of sixes hit in an ashes series)
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल 25 हजार धावा करणाऱ्या विराटवर आली ‘वॉटर बॉय’ बनण्याची वेळ, तरीही जिंकली कोट्यवधी मने- Video
गजबच! ब्रॉड बनला अँडरसनच्या कारकीर्दीत निवृत्त होणारा आठवा खेळाडू, यादीत 2 भारतीयांचाही समावेश