यंदाची महिला टी20 विश्वचषक स्पर्धा दुबईच्या भूमीवर आयोजित केली आहे. ज्यामध्ये 10 संघ सहभागी झाले आहेत. सर्व संघ विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ देखील आपले पहिले विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. गट टप्प्यासाठी 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी 5 संघांचा समावेश आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये टीम इंडिया व्यतिरिक्त पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.
तर ब गटात बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. या स्पर्धेची सुरुवात 3 ऑक्टोबर रोजी बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याने झाली आहे. महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडिया कधी खेळणार आहे आणि त्याचे पूर्ण वेळापत्रक काय आहे ते जाणून घेऊया.
महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाचे उर्वरीत वेळापत्रक
6 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई (भारतीय वेळेनुसार दुपारी 7.30 वाजता)
9 ऑक्टोबर – भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई (संध्याकाळी 7.30 वाजता)
13 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह (संध्याकाळी 7.30 वाजता)
भारतीय संघाचे हे वेळापत्रक ग्रुप स्टेजपर्यंत आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ग्रुप स्टेज संपल्यानंतर टॉप 2 मध्ये स्थान मिळवावे लागेल. यानंतर, अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी, त्याला ब गटातील अव्वल 2 संघांपैकी एकाचा सामना करावा लागेल, ज्याचा तपशील गट स्टेज संपल्यानंतर कळेल. पण या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभवा झाला आहे. आता अश्या स्थितीत पुढील सामना भारतासाठी म्हत्वाचा आहे.
महिला टी20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाचा संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक) (फिटनेस), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, रेणुका सिंह ठाकूर, डेली. , आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन
हेही वाचा-
ind vs ban; सॅमसनने अभिषेक शर्मासोबत ओपनिंग करावी? पाहा सलामीवीर म्हणून आकडेवारी
श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीला ग्रहण, इराणी चषकातही सपशेल फ्लॉप
“धोनी नाही, हा आहे जगातील सर्वोत्तम फिनिशर”, कुमार संगकाराचं मोठं वक्तव्य