---Advertisement---

टीम इंडियाचा नादच खूळा! कोणत्याही संघाला जमले नाही ते करुन दाखवले

On: शुक्रवार, जानेवारी 18, 2019 5:12 PM
---Advertisement---

मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच द्विपक्षीय वनडे मालिका जिंकण्याचा इतिहासही भारताने रचला आहे.

याआधी भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत 2-1असा विजय मिळवला आहे. तर टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे. यामुळे भारत हा पहिलाच देश ठरला आहे ज्याने एका ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी, वन-डे आणि टी20 मालिकेत पराभव स्विकारलेला नाही.

आजच्या सामन्यात भारताकडून एमएस धोनी आणि केदार जाधवने अर्धशतके करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. या सामन्यात धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 धावा आणि केदारने 57 चेंडूत 61 नाबाद धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त विराट कोहलीनेही 46 धावा करत चांगली खेळी केली होती.

तत्पूर्वी भारताकडून युजवेंद्र चहलने 42 धावांत 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावांवर संपुष्टात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेप्रमाणेच वनडेतही टिम इंडियाने रचला इतिहास

चार वर्षांनंतर धोनीने केली त्या पराक्रमाची पुनरावृत्ती

धोनीने भारताच्या या दिग्गजाचाही विक्रम टाकला मागे, आत्ता फक्त सचिन तेंडुलकर आहे पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment