टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) होणाऱ्या लढतीपूर्वी भारत आणि न्यूझीलंड संघांनी जोरदार सराव केला आहे. न्यूझीलंडने भारताला घेरण्याची योजना आखली असून, भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्याचा निर्धार केला. या सामन्यात काय पाहायला मिळणार याचा ट्रेलर भारत आणि न्यूझीलंडच्या सराव सत्रात पाहायला मिळाला.
भारताच्या सराव सत्रात सगळ्यात जास्त लक्ष हार्दिक पंड्यावर होते. संघाच्या सराव सत्राची सुरुवात धावण्याने झाली. ज्यामध्ये पंड्या स्वतंत्रपणे धावताना दिसला. सराव सत्रादरम्यान धावण्यासोबतच पंड्याला फिटनेस चाचणी द्यावी लागली. ट्रेनिंग सेशनमध्ये तो काही फिटनेस ड्रिल करताना दिसला. यावेळी संघाचे फिजिओ आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचही तेथे उपस्थित होते.
Some fun catching drills going on.#TeamIndia #INDvNZ @News9Tweets pic.twitter.com/yexGrNZQg8
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) October 30, 2021
https://twitter.com/CricSubhayan/status/1454482160182865929?s=20
भारताच्या सराव सत्रातील सर्वात खास चित्र म्हणजे मेंटर एमएस धोनीने युवा खेळाडूंसोबत घालवलेला वेळ. ज्यामध्ये रिषभ पंत यष्टीरक्षणाचे कौशल्य शिकताना आणि पंड्या धोनीकडून लांब फटके मारण्याच्या क्लुप्त्या शिकताना दिसला. धोनीने आधी त्या दोघांचे निरीक्षण केले. त्यानंतर त्याच्या मास्टर क्लासमध्ये यष्टीरक्षण आणि पॉवर हिटिंगच्या पद्धती सांगितल्या. याआधी धोनी, विराटसह भारतीय संघातील सर्व सदस्य सरावासाठी मैदानावर पोहोचले होते. या सरावामूळे न्यूझीलंडविरुद्धचा सामना किती महत्त्वाचा आहे, ही जाणीव भारतीय खेळाडूंना असल्याचे दिसून येते.
https://twitter.com/CricSubhayan/status/1454458620842807310?s=20
दुसरीकडे न्यूझीलंडलाही या सामन्याचे महत्त्व चांगलेच माहित आहे. त्यामुळे त्यांचे गोलंदाज सराव सत्रात घाम गाळताना दिसले. संघाचे वेगवान गोलंदाज नेटमध्ये गोलंदाजी करत असतानाच फिरकी गोलंदाज ईश सोधीनेही गुगली टाकण्याचा प्रयत्न केला.
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व वरूण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/kagiso-rabada-run-out-charith-asalanka-in-sa-vs-sl-t20-world-cup-2021-video/
https://mahasports.in/dream-xi-prediction-of-india-vs-new-zealand-t20-world-cup-match/