भारतीय संघ आजकाल श्रीलंकेच्या दौर्यावर आहे. वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असल्याने दुसरा संघ शिखर धवनच्या नेतृत्वात येथे खेळेल. तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका १३ जुलैपासून सुरू होणार आहे. यापूर्वी सोमवारी (५ जुलै) भारतीय खेळाडू इंट्रा-स्क्वॉड मॅच खेळताना दिसले. या मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची अद्याप घोषणा झालेली नाही.
हे खेळाडू दिसले खेळताना
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकृत इंट्रा-स्कॉड सामन्यात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करताना दिसला. या दौर्यासाठी त्याला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भुनेश्वरला इंग्लंड दौऱ्यावर संधी मिळायला हवी होती, असे अनेक माजी खेळाडूंनी म्हटले. इंग्लंडमधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला, या सामन्यात भारतीय संघाला त्याची कमतरता जाणवली. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून होणार आहे.
डावखुरा फलंदाज नितीश राणा यालाही श्रीलंका दौर्यासाठी जागा मिळाली आहे. तोदेखील या सामन्यात फलंदाजी करताना दिसला. तो या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. याशिवाय ऋतुराज गायकवाड, हार्दिक पंड्या, मनीष पांडे यांनीही या सामन्यात भाग घेतला. आयपीएल गाजवणारे वेगवान गोलंदाज चेतन सकारिया व सलामीवीर देवदत्त पडिक्कल हे देखील या दौऱ्यावर आपला पहिला सामना खेळताना दिसतील.
📸 Snapshots from India national team's Intra-Squad practice match at SSC grounds.#SLvIND pic.twitter.com/2vNJvu4IwN
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 5, 2021
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल , राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन साकारिया.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यातून गिल बाहेर! संघ व्यवस्थापनाने बदली खेळाडू म्हणून सुचवले दोन पर्याय
हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने ‘या’ खेळाडूने प्रेयसीला केले प्रपोज, व्हिडिओ होतोय व्हायरल
युरो कप २०२०: उपांत्यपूर्व फेरीतील काही नेत्रदीपक गोल, पाहा व्हिडिओ