टी20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात 6 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, पण या पराभवातून भारतीय संघालाही धडा शिकायला मिळाला आहे. टीम इंडीयाला हे चांगलेच समजले आहे की जर त्यांना आयसीसी ट्राॅफी जिंकायचे असेल तर कोणत्याही संघाला हलक्यात घेणे चूकीचे राहील. अमेरिकेविरुद्धच्या पराभवात पाकिस्तानच्या बाजूने अनेक चुका दिसून आल्या.
अशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या या मोठ्या पराभवातून भारतीय संघ शिकू शकेल अशा चार प्रमुख गोष्टीबद्दल बोलणार आहोत
पॉवरप्लेमध्ये सावध फलंदाजी करावी लागेल
अमेरिकेविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये पाकिस्तान संघाने 3 मोठ्या विकेट्स गमावल्या. त्याचा परिणाम असा झाला की त्याचे फलंदाज शेवटपर्यंत विकेट वाचवताना दिसले. सुरुवात चांगली झाली असती तर शेवटी फलंदाज मोकळेपणाने खेळले असते आणि लक्ष्य मोठे होऊ शकले असते, पण तसे झाले नाही. पाकिस्तानची ही अवस्था पाहून टीम इंडिया नक्कीच सावध झाली असेल. रोहित आणि कंपनी पॉवरप्लेमध्ये सावधपणे खेळण्याचे नियोजन करू शकतात. शेवटच्या षटकांमध्ये, जेव्हा खेळपट्टी थोडी चांगली होते, तेव्हा तो मोठ्या फटक्यांसाठी पुढे जाऊ शकतो.
पहिल्या सहा षटकात गोलंदाजी
पहिल्या 6 षटकांमध्ये गोलंदाजांना खेळपट्टीची खूप मदत मिळत असल्याचे दिसते. अशा स्थितीत विरोधी संघाविरुद्ध कोणत्या रणनीतीने मैदानात उतरायचे याची प्लॅनिंग आधीच तयार करावी लागेल. खेळपट्टीची स्थिती लक्षात घेऊन कर्णधार आणि प्रशिक्षकांनी आत्तापासूनच योजना करायला सुरुवात केली असेल, अशी आपल्याला आशा आहे.
‘सुपर ओव्हर’मध्ये चुकूनही वाइड गोलंदाजी करू नका
मोहम्मद आमिरने पाकिस्तानसाठी ‘सुपर ओव्हर’मध्ये एकूण 3 वाइड चेंडू टाकले. दरम्यान, अमेरिकेला वाइड्ससह बाय मिळाला. त्यामुळे यजमान संघ 1 गडी गमावून 18 धावा करु शकला. जर आमिरने वाइड बॉलिंग केली नसती तर बाईजही मिळाले नसते. अशा स्थितीत यूएसएचा संघ ‘सुपर ओव्हर’मध्ये केवळ 11 धावा करू शकला. पण पाकिस्तानने त्याने एकूण 7 धावा अतिरिक्त दिल्या. अशा परिस्थितीत टीम इंडीया ‘सुपर ओव्हर’ गाठला तर रोहित ब्रिगेड अतिरिक्त धावांची काळजी घेईल.
उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण
पाकिस्तान अमेरिकेविरुद्ध सामन्यात खास क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही. सुरुवातीच्या इफ्तिखार अहमदनी मोनांक पटेलचा कॅच सोडला, तसेच चाैकारही सोडल्या, एकूण पाकिस्तानला उत्कृष्ट दर्जाची क्षेत्ररक्षण करता आले नाही. अश्या परिस्थित टीम इंडीयाला क्षेत्ररक्षणावर आधिक भर द्यावा लागेल.
महत्तवाच्या बातम्या-
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी 2024-25 चे वेळापत्रक केले जाहीर!
पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या सौरभ नेत्रावळकरचा मराठमोळा अंदाज! सलील कुलकर्णींनी शेअर केला सुरेल आवाजाचा व्हिडिओ
महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीला भारतीय संघाचा निरोप; शेवटच्या सामन्यात मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’!