भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत यजमानांना सलग दुसरा पराभव पाहावा लागला आहे. प्रभारी कर्णधार रिषभ पंत याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सलग दुसरा टी२० सामना गमावला आहे. कटकच्या बाराबती स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला ४ विकेट्सने पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. या पराभवानंतर भारतीय संघ नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्याविना किती दुबळा ठरतो, हे अजून एक स्पष्ट झाले आहे.
भारतीय संघाने (Team India) वर्ष २०२२ मध्ये कर्णधार रोहितशिवाय (Rohit Sharma) जितकेही सामने खेळले आहेत, ते सर्व सामने गमावले आहेत. अगदी ३ वेगवेगळे कर्णधार मिळवूनही भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकलेले नाहीत.
रिषभ, राहुल, विराट सगळे फेल
भारतीय संघाने आतापर्यंत चालू वर्षात एकूण १८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील ११ सामन्यांमध्ये रोहितने संघाचे नेतृत्त्व केले आहे, तर उर्वरित ७ सामने इतर खेळाडूंच्या नेतृत्त्वाखाली खेळले आहेत. इतर खेळाडूंच्या कर्णधारपदाखाली झालेले सातच्या सात सामने भारताने गमावले (Team India’s Seventh Defeat) आहेत. यावर्षी भारताने दक्षिण आफ्रिकेत २ कसोटी सामने खेळले होते, एक केएल राहुल आणि दुसरा विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली. या दोन्हीही सामन्यात भारत पराभूत झाला आहे. त्यानंतर राहुलच्याच नेतृत्त्वात दक्षिण आफ्रिकेत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघ क्लिन स्वीप झाला होता. आता रिषभच्या (Rishabh Pant) कर्णधारपदाखाली भारतीय संघ सलग २ सामने हारला आहे.
फक्त रोहितच्या नेतृत्त्वाखाली जिंकलेत सामने
याउलट रोहितच्या नेतृत्त्वात मात्र भारतीय संघाने एकही पराभव पाहिलेला नाही. ११ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करताना त्याने फक्त विजय दाखवला आहे. चालू वर्षात वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने ३ वनडे सामने खेळले होते आणि ३ टी२० मालिकाही खेळल्या होत्या. या दोन्ही मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला आहे. तसेच श्रीलंकेविरुद्ध सलग ३ टी२० सामने आणि २ कसोटी मालिकाही भारतीय संघाने जिंकल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पहिले पाढे पंचावन्न! भारतासाठी दक्षिण आफ्रिकेला हरवणं कठीण, कसोटी, वनडेनंतर टी२०त खातोय गटांगळ्या
टी२० क्रिकेटमध्ये भारताच्या एकट्या भुवनेश्वरने केलीये ‘ही’ कामगिरी, विक्रम मोडणे खूपच अवघड