---Advertisement---

मिडल ओवरमध्ये कमी धावा ते पावप्लेमध्ये विकेट्सची उणीव; वाचा दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची कारणे

---Advertisement---

पुणे शहरातील गहुंजे स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना शुक्रवार रोजी (२६ मार्च) झाला. पाहुण्या इंग्लंडने ६ विकेट्सने हा सामना जिंकत मागील पराभवाचा वचपा काढला. याबरोबरच मालिकेत १-१ ने बरोबरीही साधली.

नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी गोलंदाजी निवडली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. केएल राहुलचे झुंजार शतक आणि विराट कोहली, रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३३६ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल जॉनी बेयरस्टो (१२४ धावा) आणि बेन स्टोक्सने (९९ धावा) भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्यांच्या तूफानी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ३ विकेट्स गमावत ४३.३ षटकातच भारताचे लक्ष्य पूर्ण केले.

भारताच्या या दारुण पराभवास गोलंदाजीसह फलंदाजी आणि नाणेफेक अशा बऱ्याच गोष्टी जबाबदार ठरल्या.

चला तर पाहूया, भारताच्या दुसऱ्या वनडेतील पराभवामागची कारणे :-

इंग्लंडची सलामी जोडी लवकर तोडण्यात आलेले अपयश- इंग्लंडचे सलामीवीर जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉय यांना रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. १६.३ षटकात ११० धावांवर जेसनच्या रुपात भारताला पहिली विकेट मिळाली. तोवर जेसन आणि बेयरस्टो यांनी आपली अर्धशतके पूर्ण केली होती. पहिल्या १५ षटकातच इंग्लंडच्या सलामीवीरांनी १०० धावांचा आकडा ओलांडल्याने मधल्या फळीतील फलंदाजांचे काम सोपे झाले.

मिडल ओवरमध्ये भारताच्या फार कमी धावा- भारतीय संघाने ११ ते ४० षटकांमध्ये अवघ्या १६९ धावा काढल्या. दुसरीकडे इंग्लंडने मिडल ओवरमध्ये २५९ धावा जोडल्या. अर्थातच त्यांवी भारतापेक्षा जवळपास ९० धावा जास्त काढल्या. त्यामुळे इंग्लंडवर अंतिम षटकांपर्यंत जाण्याची वेळच आली नाही आणि ४४ व्या षटकातच त्यांनी सामना जिंकला.

सहाव्या गोलंदाजाची उणीव- भारतीय संघाने पहिल्या वनडेप्रमाणे दुसऱ्या वनडेतही ५ गोलंदाजांचा वापर केला. मात्र भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर यांचा अनुभव या सामन्यात कमी पडला. तर दुसराच वनडे सामना खेळत असलेल्या गोलंदाज कृणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही खास कामगिरी करता आली नाही. अशात संघाला सहाव्या गोलंदाजाची कमतरता भासली. याउलट इंग्लंडने त्यांच्या ६ गोलंदाजांचा पुरेपूर वापर केला.

फिरकीपटू सपशेल फेल- पुणे स्टेडियम वेगवान गोलंदाजीसह फिरकी गोलंदाजीसाठीही पोषक आहे. अशात भारतीय फिरकीपटूंकडून त्यांच्या घरच्या मैदानावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र फिरकी गोलंदाज कृणाल पंड्या ६ षटकात ७२ धावा देत एकही विकेट घेऊ शकला नाही.

नाणेफेक ठरली महत्त्वाची- भारतीय मैदानांवर लक्ष्याचा पाठलाग करणे सोईचे ठरते असले म्हटले जाते. इंग्लंडने या गोष्टीचा पुरेपूर लाभ घेतला. त्यांनी या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आणि दुसऱ्या डावात भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना सहज विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लिश फलंदाजांनी चोप चोपलं, तरीही का दिली नाही हार्दिकच्या हाती बॉलिंग? कॅप्टन विराट म्हणतो…

मोठी ब्रेकिंग: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर कोविड पॉझिटिव्ह, ट्विट करत दिली माहिती

दुसऱ्या वनडेत शतक झळकावल्यानंतर का पकडले कान? केएल राहुलने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---