---Advertisement---

वेंकटेशचे पदार्पण ते अश्विन-युझीचं एकत्र खेळणं, पर्ल वनडे अनेक कारणांनी भारतासाठी राहिली खास

On: बुधवार, जानेवारी 19, 2022 4:37 PM
ind team
---Advertisement---

कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) संघ ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमने सामने आले आहेत. या मालिकेतील पहिला सामना (First ODI) पर्ल येथील बोलँड पार्क स्टेडियमवर झाला. पाहुण्या भारतीय संघासाठी सर्वार्थाने हा सामना अतिशय खास राहिला. (Team India Made Special Records)

१. या सामन्यात भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली मैदानात उतरला होता. वनडे संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर आहे. त्यामुळे सलामीवीर फलंदाज केएल राहुल (Captain KL Rahul) याच्या खांद्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला वनडे सामना हा राहुलचा अ दर्जाच्या क्रिकेटमधील कर्णधार म्हणून पहिला सामना होता.

व्हिडिओ पाहा- क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा

२. भारतीय संघाकडून या सामन्यात वेगवान गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांना जागा दिली गेली. तर फिरकीपटू म्हणून आर अश्विन (R Ashwin) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)ला खेळवले गेले. अशाप्रकारे पहिल्यांदाच फिरकी गोलंदाज अश्विन आणि चहल कोणत्या आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळताना दिसले.

३. महत्त्वाचे म्हणजे, तब्बल ६ महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय संघाने वनडे सामना खेळला. जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताने त्यांचा शेवटचा वनडे सामना खेळला होता. या सामन्यात शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होता.

४. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) फक्त खेळाडू म्हणून मैदानावर उतरला होता. तब्बल १० वर्षांनंतर तो वनडे संघाचा कर्णधार किंवा उपकर्णधार नसून फक्त खेळाडू म्हणून खेळत होता. यापूर्वी २०१२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध होबार्ट येथे त्याने केवळ खेळाडू म्हणून शेवटची वनडे खेळली होती. या सामन्यात त्याने ८६ चेंडूंचा सामना करताना नाबाद १३३ धावा केल्या होत्या.

५. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेंकटेश अय्यर (Venktesh Iyer) याला संधी दिली गेली होती. हा त्याचा पदार्पणाचा वनडे (Venktesh Iyer Debut) सामना ठरला.

अशाप्रकारे हा पहिला वनडे सामना भारतीय संघ आणि भारतीय संघातील खेळाडूंसाठी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने खास राहिला.

महत्त्वाच्या बातम्या-

अष्टपैलू कामगिरीने तगड्या संघांची ‘शाळा’ घेणारा बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला ‘स्कॉलर’ अय्यर

बिग ब्रेकिंग! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाकडून निवृत्तीची घोषणा, २०२२ असेल कोर्टवरील अखेरचे वर्ष

“आता विंटेज रूप पाहायला मिळणार”, विराटच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

हेही पाहा-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---