चेन्नई कसोटींचा टप्पा पार पाडल्यानंतर भारत आणि इंग्लंड संघ अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर अखेरचे २ कसोटी सामने खेळणार आहेत. त्यातील दिवस-रात्र स्वरुपात होणारा तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. प्रत्येकी एका विजयासह कसोटी मालिका बरोबरीवर असल्याने या सामन्यात दोन्ही संघांदरम्यान काट्याची टक्कर पाहायला मिळणे निश्चित आहे.
तत्पुर्वी या सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडने आपापल्या संघाची घोषणा केली आहे. परंतु प्लेइंग इलेव्हन जाहीर होणे, अद्याप बाकी आहे. अशात इंग्लंडशी भिडण्यासाठी भारतीय संघ काही बदलांसह मैदानावर उतरु शकतो.
अक्षरच्या जागी हार्दिकला संधी
अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याला संधी मिळू शकते. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याद्वारे पदार्पण करणारा अक्षर पटेलला या सामन्यात बाकावर बसावे लागेल. यामागचे मुख्य कारण म्हणजे, तिसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र स्वरुपात होणार असल्याने या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर केला जाईल.
यामुळे फिरकीपटूंपेक्षा जास्त वेगवान गोलंदाजांना याचा फायदा होईल. म्हणून भारताचा कर्णधार विराट कोहली फिरकीपटू अक्षरला बाहेर करुन वेगवान गोलंदाज हार्दिकला निवडण्याचा विचार करेल.
कुलदीपला वगळून बुमराहचे पुनरागमन
याबरोबरच रोटेशन पॉलिसीनुसार दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती दिलेल्या जसप्रीत बुमराहची या सामन्याद्वारे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने अनुभवी वेगवान गोलंदाज बुमराहला खेळवणे अधिक सोईचे ठरले. अशात बुमराहला अंतिम एकादशमध्ये स्थान दिल्यास फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघाबाहेर केले जाऊ शकते.
नुकत्याच दुसऱ्या सामन्याद्वारे कुलदीपने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. परंतु या सामन्यात त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने दोन्ही डावात मिळून फक्त २ विकेट्स घेतल्या होत्या. उर्वरित संघ दुसऱ्या कसोटी सामन्याप्रमाणे असेल.
अखेरच्या २ कसोटींसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव (तंदुरुस्तीवर अवलंबून).
तिसऱ्या कसोटी सामन्याची संभावित प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-