यावर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकाच्या आयोजनावर टांगती तलवार कायम आहे. पाकिस्तानशी असेलल्या वादग्रस्त संबंधांमुळे भारत आपल्या क्रिकेटपटूंना पाकिस्तानात न पाठवण्याच्या रणनीतीवर कायम आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी आशिया चषकाच्या आयोजनासाठी नवीन मार्ग काढला आहे. पीसीबीने आशिया चषकात खेळल्या जाणाऱ्या भारताच्या सामन्यांचे आयोजन पाकिस्तानऐवजी तटस्थ ठिकाणांवर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी (Najam Sethi) यांच्याकडून आशियाई क्रिकेट परिषदेला हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये म्हटले गेले आहे की, भारत आपले सामने तटस्थ ठिकाणांवर खेळू शकतो. तसेच, इतर संघ पाकिस्तानात खेळतील.
नजम सेठी काय म्हणाले?
नजम सेठी म्हणाले की, “आम्ही हायब्रिट मॉडेलवर स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात पाकिस्तान आशिया चषकातील आपले सामने घरगुती मैदानांवर आणि भारत त्यांचे सामने तटस्थ ठिकाणांवर खेळेल. आशियाई क्रिकेट परिषदेपुढे आम्ही हा प्रस्ताव ठेवला आहे.”
आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेचे आयोजन 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. यामध्ये सहा संघ भाग घेणार आहेत. आयोजन ठिकाणांबाबत अनिश्चितता असल्यामुळे अद्याप सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली नाहीये. पाकिस्तान आणि भारताव्यतिरिक्त आशिया चषकात श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेशसह एक क्वालिफायर संघही भाग घेईल. क्वालिफाय स्पर्धा नेपाळमध्ये सुरू आहे.
भारतासोबतचे संबंध सुधारण्याची अपेक्षा
पुढील महिन्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन काऊंसिलच्या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या भारत भेटीपासून सेठी यांना खूप आशा आहेत. त्यांना आशा आहे की, परराष्ट्र मंत्र्यांच्या गोवा प्रवासामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदत मिळेल.
सेठी म्हणाले की, “आम्हाला सांगण्यात आले आहे की, नाते सामान्य होऊ शकतात. असे झाले, तर 2025मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेण्यावर भारत विचार करेल. आम्हाला तटस्थ ठिकाणावर आशिया चषक खेण्यासोबतच विश्वचषकासाठी भारतात जाण्याचा सल्ला दिला गेला आहे.”
सेठी यांनी संकेत दिले की, त्यांच्या देशातील जनतेचे असे मत आहे की, पाकिस्तानला भारतासोबत समान अटीशर्तींवर क्रिकेट खेळले पाहिजे. आता पीसीबी अध्यक्षांचा हा प्रस्ताव मान्य केला जातो की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (team india might play asia cup 2023 as pcb make new formula for the tournament know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेक जिंकत गुजरात संघाचा फलंदाजीचा निर्णय, चौथ्या विजयासाठी पंड्यासेना सज्ज
बिग ब्रेकिंग! क्रिकेट खेळताना 14 वर्षीय मुलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, पुणे हादरलं