टीम इंडियाने काल (12 ऑक्टोबर) शनिवारी बांग्लादेशला पछाडले. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडण्यापासून भारतीय संघ फक्त 3 धावा दूर राहिला. भारताने 297 धावा केल्या. जी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या देशाची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय टीम इंडियाने पुरुषांच्या टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम केला. यामध्ये टी20 लीग, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि डोमेस्टिक टी20 लीगचा समावेश आहे. टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात 200 हून अधिक धावा केल्या आहेत. सॉमरसेट संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
टीम इंडियाने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विक्रमी 37 व्यांदा एका डावात 200 हून अधिक धावा केल्या. आतापर्यंत पुरुष क्रिकेटमध्ये 36 वेळा सॉमरसेट संघ पहिल्या स्थानावर होता. सॉमरसेट संघ इंग्लंडच्या डोमेस्टिक टी20 लीगमध्ये खेळतो. यादीत तिसऱ्या स्थानावर, सर्वाधिक वेळा 200 पेक्षा जास्त धावा करणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच सीएसके, ज्यांनी आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये एकत्र हा विक्रम केला आहे. जो लीग क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीचे नाव देखील समाविष्ट आहे. ज्यांनी 33 वेळा टी20 क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणारा यॉर्कशायर संघ या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या संघाने 31 वेळा टी20 क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचा संघ पुरुषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. ज्यांनी टी20 क्रिकेटमध्ये केवळ 23 वेळा 200 प्लस धावा केल्या आहेत. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियन संघ भारतापासून कोसो मैल दूर आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 200 पेक्षा जास्त धावा करणारे पुरुष संघ
37 – भारत
36 – समरसेट
35 – सीएसके
33- आरसीबी
हेही वाचा-
ind vs nz; कसोटी मालिकेसाठी किंग कोहली बेंगळुरूला रवाना; बालेकिल्ल्यात 3 दिवसांनी सामना
मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं ट्रॉफी कोणाला दिली? टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
भारताचे वर्ल्ड कप विजेते प्रशिक्षक मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, संघानं दिली मोठी जबाबदारी