आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणार आहे. १८ ते २२ जून या कालावधीत एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर हा सामना खेळवला जाईल. भारतीय संघ या सामन्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचला असून, त्यांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. मात्र, भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याने या सामन्यापूर्वी भारत नुकसानाचा स्थितीत असल्याचे म्हटले.
या कारणाने भारताला होणार नुकसान
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराजने नुकतीच एका क्रीडा वाहिनीला मुलाखत दिली. त्याने या मुलाखतीत विविध विषयांवर आपली मते मांडली.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या मुद्द्यावर बोलताना तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, विराट कोहलीचा भारताचा संघ सध्या नुकसानाच्या परिस्थितीत आहे. कारण, भारतीय संघ या महत्त्वपूर्ण सामन्यात मर्यादित तयारी करून उतरेल. संघ या सामन्यापूर्वी ८ ते १० सराव सत्रे घेईल. परंतु, एका सराव सामन्याची कमी त्यातून भरून निघणार नाही. या तुलनेत न्यूझीलंड संघ या ठिकाणी बऱ्याच कालावधीपासून आहे. तसेच ते इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका देखील खेळत आहेत. याचा त्यांना फायदा होईल.”
भारतीय संघ या अंतिम सामन्यापूर्वी आपल्याच संघाचे दोन भाग करून एक सराव सामना खेळेल अशी माहिती समोर येत आहे.
सलामीवीरांवर असेल जबाबदारी
युवराजने या सामन्यासाठी भारतीय सलामीवीरांवर मोठी जबाबदारी असेल असे म्हटले आहे. युवराज म्हणाला, “मला वाटते भारताचे सलामीवीर कसे कामगिरी करतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. रोहित आता एक अनुभवी फलंदाज बनला आहे तर, शुबमन गिलकडे प्रतिभा आहे. केवळ या दोघांना इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सलामी करण्याचा अनुभव नाही. रोहितने ७ कसोटी शतके झळकावली असून, त्याच्यावरील जबाबदारी आता आणखीन वाढली आहे. तरीदेखील भारताचा संघ विशेषता फलंदाजी अत्यंत मजबूत असून, आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल.”
युवराज सिंग याने या मुलाखतीत या अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्युक चेंडू, एजबॅस्टनच्या मैदानावरील खेळपट्टी व एकूण वातावरणाविषयी देखील मत मांडले. तसेच, भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवेल असा आशावाद देखील व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या –
द ग्रेट लारा! वेस्ट इंडीज दिग्गजाच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळीला २७ वर्ष पूर्ण
‘ते’ छायाचित्र पोस्ट करून फसले सौरव गांगुली; चाहत्यांनी ट्रोल करताच हटवली पोस्ट
‘भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप नाही जिंकली तरी चालेल, पण…’, भारताच्या माजी सलामीवीराची अजब इच्छा