गाैतम गंभीर भारतीय संघाचा नवा हेड कोच बनला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी या बाबत सोशल मीडियावर पोस्ट करुन खुलासा केले आहे. गाैतम गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली आहे. 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा संपला होता. द दरम्यान आता अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहेत. अखेर संघाचा नवा हेड कोच गाैतम गंभीरला यासाठी किती पगार मिळणार? गंभीरचे पगार माजी हेड कोच राहुल द्रविड पेक्षा जास्त असणार की कमी? चला तर जाणून घेऊयात.
वृत्त अहवालावर विश्वास ठेवले तर भारताचे माजी हेड कोच राहुल द्रविड यांनी पगार म्हणून दरवर्षी 12 कोटी रुपये दिले जात होते. म्हणजेच राहुल द्रविडला महिन्याला 1 कोटी रुपये पगार होती. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक हे हाय प्रोफाईल काम आहे, ज्यामुळे बीसीसीआय चांगला पगार देते. द्रविडने नोव्हेंबर 2021 ते जून 2024 पर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार गाैतम गंभीरला राहुल द्रविडपेक्षा जास्त म्हणजेच 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक, नवा मुख्य प्रशिक्षकाच्या पगारीबाबत बीसीसीआयकडून आधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु राहुल द्रविड पेक्षा गाैतम गंभीरला जास्त पगार देण्याची शक्यता आहे.
गाैतम गंभीरची आगामी श्रीलंका दाैऱ्यापासून आपल्या हेड कोचच्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहे, भारतीय संघ 27 जुलै पासून श्रीलंका दाैरा करणार आहे. ज्यामध्ये संघ 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेपासून भारतीय क्रिकेटमध्ये गंभीरचा काळ सुरु होईल. तर गंभीरचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 पर्यंत राहील. गाैतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ जवळपास 4 आयसीसी स्पर्धा खेळणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
गौतम गंभीर हेड कोच बनला, आता ‘या’ 3 खेळाडूंना संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता नाही
टीम इंडियाचा हेड कोच झाल्यानंतरही गाैतम गंभीर ‘केकेआर’चा मेंटाॅर राहणार का? पाहा बीसीसीआयचा नियम
केकी तारापोरपासून गौतम गंभीरपर्यंत, 25 मुख्य प्रशिक्षकांनी सांभाळली टीम इंडियाची जबाबदारी; वाचा संपूर्ण यादी