वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील अखेरचा टी20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. यासह मालिका वेस्ट इंडीजने आपल्या नावावर केली. मात्र हा पराभव भारतीय संघ मागील जवळपास दोन वर्षांपासून सातत्याने अपयश ठरत असल्याचे द्योतक ठरला.
भारतीय संघ या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यामुळे पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर पुढील दोन सामने भारतीय संघाने आपल्या नावे केले. परंतु अखेरच्या सामन्यात यजमान संघाने एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघाने तीन किंवा तीन पेक्षा अधिक सामन्यांची वेस्ट इंडीजविरुद्ध टी20 मालिका तब्बल सतरा वर्षानंतर गमावली.
ही मालिका गमावली असली तरी भारतीय संघाची 2021 पासून कामगिरी लक्षात राहणारी झालेली नाही. 2021 टी20 विश्वचषकात भारतीय संघ पहिल्या फेरीतून बाहेर झालेला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत कसोटी व वनडे मालिका गमवावी लागली होती. यानंतर इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी भारताने हरली. त्यानंतर झालेल्या आशिया चषकात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता. तर, टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा दारुण पराभव झालेला. यानंतर भारताने ऑस्ट्रेलिया व बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावल्या.
नव्या हंगामात भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर आता हा पराभव पाहावा लागल्याने भारतीय संघाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. आगामी काळात भारताला आशिया चषक व वनडे विश्वचषक खेळायचा आहे. या दोन्ही स्पर्धा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा दबाव भारतावर असेल.
(Team India Not Winning Any Major Series Or Tournament Since 2021)
महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तान संघाला लाभला भारतीय गुरु! तब्बल 32 वर्षांचा अनुभव करणार शेअर
वेस्ट इंडीज दौऱ्यावर संजू पूर्णपणे फ्लॉप! खराब कामगिरीने पुन्हा आला चाहत्यांच्या निशाण्यावर