भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका बुधवारी (22 मार्च) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलिया संघ मालिका जिंकण्यात यशस्वी झाला. त्याचवेळी या मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा भारताचा सूर्यकुमार यादव हा पुरता अपयशी ठरला. त्याला तीनही सामन्यात मिळून एकही धाव करता आली नाही. वनडे विश्वचषक तोंडावर असताना भारतीय संघाला आता चौथ्या क्रमांकाचा प्रश्न पुन्हा एकदा भेडसावू लागला आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 वन डे विश्वचषकापासून भारतीय संघाची चौथ्या क्रमांकाची समस्या अद्याप पूर्णतः सुटलेली नाही. भारतीय संघ 2019 विश्वचषकात चौथ्या क्रमांकाचा योग्य फलंदाज नसल्याने पराभूत झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यानंतर या मधल्या चार वर्षाच्या काळातही भारतीय संघ अद्याप ती कमजोरी भरून काढण्यात अपयश ठरल्याचे दिसते.
भारतीय संघासाठी 2019 ते 2023 या कालावधी चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक संधी श्रेयस अय्यर याला मिळाली. त्याने या क्रमांकावर 20 डावांमध्ये फलंदाजी करताना 47.35 च्या सरासरीने 805 धावा केल्या. तो या असतानाचा सर्वात मोठा दावेदार असला तरी, तो सध्या दुखापतग्रस्त आहे. माध्यमातील वृत्तानुसार, त्याला बरे होण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागू शकतो. असे झाल्यास तो विश्वचषकाला देखील मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या जागी सक्षम पर्याय संघ व्यवस्थापनाला शोधावा लागेल.
चौथ्या क्रमांकावरच 11 डावांमध्ये फलंदाजी केलेल्या रिषभ पंतने 36 च्या सरासरीने 360 धावा केल्या. मात्र, त्याची परिस्थिती देखील श्रेयस प्रमाणेच आहे. तो देखील दुखापतग्रस्त असून, त्याच्या पुनरागमनाबाबत कोणतीही माहित समोर येत नाही. त्यानंतर सूर्यकुमार यादव व ईशान किशन हे या क्रमांकावर पूर्णतः अपयशी ठरले. या तिघां व्यतिरिक्त विराट कोहली व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक वेळा या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता आता भारतीय संघाला कदाचित नवा नंबर 4 शोधण्याची वेळ येऊ शकते. भारतात ऑक्टोंबर-नोव्हेंबर या कालावधीत वनडे विश्वचषक खेळला जाईल.
(Team India Number 4 Myth In ODI Shreyas Iyer And Rishabh Pant Injured Suryakumar Flop)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 लॉर्ड बनला एमआयचा गुरू! प्रशिक्षक म्हणून पोलार्डने सुरू केली नवीन इनिंग
पराभवाचे कारण सांगताना रोहित म्हणतोय, “वेळापत्रक खूप व्यस्त, विश्रांती मिळत नाही”