भारतीय क्रिकेट संघाचे पुढील आंतरराष्ट्रीय वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे. जुलै महिन्यात भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. याच काळात भारतीय संघाची एक तुकडी इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त असणार आहे. त्यामुळे श्रीलंकाविरुद्ध नव्या भारतीय संघाला पाठवले जाणार आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी माजी भारतीय कर्णधार आणि वर्तमान राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अध्यक्ष राहुल द्रविड याच्यावर सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.
परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, सर्वोत्कृष्ट महागुरुपैकी एक असणार द्रविड यापुर्वी भारतीय संघासाठी ‘अनलकी’ ठरला आहे. साल २०१४ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यावर द्रविड भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून कार्यरत होता. भारतीय संघाने या दौऱ्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका तब्बल १-३ च्या फरकाने गमावली होती.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत सुटला होता. त्यापुढील सामन्यात भारताने इंग्लंडला ९५ धावांनी चितपट करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. परंतु यजमान इंग्लंड संघाने पुढील सलग ३ कसोटी सामने जिंकत मालिका खिशात घातली होती. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना २६६ धावांनी जिंकला होता. तर चौथा कसोटी सामन्यात एक डाव आणि ५४ धावा व पाचव्या कसोटी सामन्यात १ डाव आणि २४४ धावांची विजयी पताका झळकावली होती. यावरुन भारतीय संघाचे फलंदाजी प्रदर्शन किती वाईट राहिले होते याचा अंदाजा लागतो.
या दौऱ्यानंतर भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट मालिकेत भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची ही द्रविडची दुसरी वेळ असेल. परंतु यावेळी भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार नसून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांना खेळाडूंसह प्रशिक्षत द्रविडकडूनही मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
वनडे आणि टी२० मालिकेचे आयोजन
भारताच्या श्रीलंका दौर्यात सर्वप्रथम वनडे मालिका खेळवली जाणार आहे. १३ जुलै रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर १६ आणि १९ जुलै रोजी वनडे मालिकेचे उर्वरित दोन सामने खेळवले जातील.
वनडे मालिका संपल्यानंतर टी२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना २२ जुलै रोजी खेळवला जाईल. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ आणि २७ जुलै रोजी खेळवले जातील. अशाप्रकारे तीन वनडे सामने आणि तीन टी२० सामने खेळवण्यात येण्याचे बीसीसीआयचे नियोजन आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गुरु हरपला! विराट कोहलीला फलंदाजीचे धडे देणारा प्रशिक्षक काळाच्या पडद्याआड
पंत आणि साहामध्ये जागेसाठी टक्कर; वृद्धिमान साहा म्हणतो, “टीम इंडियाची पहिली पसंती मला…”






