शनिवारी (9 नोव्हेंबर) भारताचा कसोटी सामन्यातील सलामीवीर फलंदाज पृथ्वी शाॅचा (Prithvi Shaw) वाढदिवस होता. त्याचबरोबर त्याच्यासाठी एक आनंदाची बातमीसुद्धा आली आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी (Sayed Mushtaq Ali Trophy) पृथ्वीची निवड मुंबई संघात होण्याची शक्यता आहे.
पृथ्वीच्या युरिनच्या नमुन्यात निर्बंध केलेला ‘टर्बुटेलाइन’ हा पदार्थ आढळला होता. त्यासंदर्भात त्याच्यावर 15 मार्च 2019ला 8 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 8 महिन्यांनंतर 16 नोव्हेंबरला संपणार आहे. यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत त्याची निवड मुंबई संघात होण्याची शक्यता आहे. अजूनतरी मुंबई संघाची (Team Mumbai) निवड झाली नाही.
“पृथ्वीच्या निवडीबद्दल विचार केला जाईल,” असे मुंबईच्या एडहाॅक निवड समितीचे (Ed Hawk Selection Committee) अध्यक्ष मिलिंद रेगे (Milind Rege) म्हणाले.
सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी मुंबईचा संघ घोषित केला जाईल. कारण, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि शिवम दूबे हे खेळाडू सध्या भारताकडून बांगलादेशविरुद्ध टी20 मालिका खेळत आहेत.
मुंबई संघाला गट स्तरावर एकूण 7 सामने खेळायचे आहेत. यामधील 6 सामने पृथ्वीला खेळता येणार नाहीत कारण, तोपर्यंत त्याच्यावरील बंदी संपलेली नसेल. मात्र त्यानंतर होणाऱ्या 7व्या सामन्यासाठी त्याची निवड होण्याची शक्यता आहे.
“16 नोव्हेंबरला पृथ्वीवरून बंदी काढण्यात येईल. आम्ही नक्कीच त्याच्या निवडीसंबंधित विचार करू. पण, त्याचे संघात पुनरागमन होईल याचे आश्वासन नाही देऊ शकत,” असे मिलिंद म्हणाले.
फेब्रुवारीमध्ये पृथ्वीचा युरिन नमुना घेण्यात आल्यानंतर त्यामध्ये निर्बंध केलेला ‘टर्बुटेलाइन’ हा पदार्थ आढळला होता. हा पदार्थ साधारणत: खोकला किंवा सर्दीच्या औषधांमध्ये आढळतो. याबद्दल पृथ्वीने खोकल्यासाठी औषध घेतल्याचे मान्य केले होते. परंतु, त्याला यात ‘टर्बुटेलाईन’ या पदार्थाचा समावेश होता, याची माहिती नव्हती.
मागील वर्षी पृथ्वीने वेस्ट इंडीजविरुद्ध (West Indies) पदार्पण केले होते. त्यात त्याने पदार्पणातच कसोटी शतक केले होते. त्याने एकूण 2 कसोटी सामन्यात 237 धावा केल्या होत्या.
लग्न सोडून क्रिकेट पाहत असलेल्या नवविवाहीत जोडप्यांचा फोटो झाला वायरल.
वाचा 👉 https://t.co/G87ijKtUKJ 👈 #म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 9, 2019
ओव्हरमधील पहिल्या ३ चेंडूवर षटकार मारलेल्या रोहितला पुढे काय करायचे होते पहाच…
वाचा – 👉https://t.co/CHiT23OOkw👈#म #मराठी #Cricket #INDvBAN @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 9, 2019