श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ 16 धावांनी पराभूत झाला. उभय संघांतील हा सामना पुण्याच्या एमसीएस स्टेडियवर खेळला गेला असून भारत लक्ष्य गाठू शकला नाही. संघात रोहित शर्मा, विराट कोहली हे दिग्गज खेळत नसताना हार्दिक पंड्या कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. हार्दिकच्या नेतृत्वात भारताने पहिला टी-20 सामना कसाबसा जिंकला, पण दुसऱ्या सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला. हार्दिकने गुरुवारी (5 जानेवारी) या सामन्यात घेतलेले काही निर्णय संघाला महागात पडले. आपण या लेखात अशाच तीन प्रमुख निर्णयांविषयी जाणून घेऊ.
नाणेफेक जिंकल्यानंतर घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय –
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने या दुसऱ्या टी-20 सामन्यान नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पुण्यातील खेलपट्टी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी प्रतिकूल असते, हे माहिती असून देखील हार्दिकने प्रणम गोलंदाजी घेतली. हार्दिक एकतर खेळपट्टी समजून घेण्यात कमी पडला असवा किंवा त्याने संघासाठी आव्हान म्हणून हा निर्णय घेतला असावा, जे त्याने मुंबईत पार पडलेल्या टी-20 सामन्यात बोलून दाखवले होते. पण यावेळी हार्दिकचा हा निर्णय संघाला महागात पडला. श्रीलंका संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला मात्र हे लक्ष्य गाठता आले नाही. भारतीय संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 190 धावांपर्यंत मजल मारू शकला.
शेवटच्या षटकांमध्ये हार्दिकने नाही केली गोलंदाजी
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने मुंबईप्रमाणेच पुण्यात देखील पावरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. पावरप्लेमधील पहिल्या षटकात त्याने 2 धावा दिल्या, तर दोन षटकांमध्ये मिळून एकूण 13 धावा दिल्या. असे असले तरी, या दोन षटकांनंतर मात्र बुमराहने एकही चेंडू टाकला नाही. त्याने हा निर्णय का घेतला, हे अद्याप समजू शकले नाहीये. पावरप्लेमध्ये किफायतशीर गोलंदाजी केल्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये हार्दिकने गोलंदाजी करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता शेवटच्या षटकांमध्ये शिवम मावी आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांना गोलंदासाठी बोलावले.
मात्र, त्याचा हा निर्णय संघासाला महागात पडला. अर्शदीप संग पुनरागमनानंतर लयीत दिसत नाहीये. अर्शदीपने या सामन्यात टाकलेल्या दोन षटकांमध्ये 37 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. शेवटच्या 30 चेंडूंमध्ये श्रीलंका संघाने 77 धावा कुटल्या. पंड्याने शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी केली असती, तर मात्र परिस्थिती काही प्रमाणात वेगळी असू शकत होती. हार्दिकाला अशा महत्वाच्या वेळी पुढाकार घेत जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची गरज आहे.
राहुल त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले –
राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) मोठ्या प्रतिक्षेनंतर पुण्यात भारतासाठी टी-20 पदार्पण करू शकला. राहुलला हार्दिकने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. विराटच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20त सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. पम दुसऱ्या सामन्यात मात्र राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले. कर्णधार हार्दिकचा हा निर्णय देखील फसल्याचेच पाहायला मिळाले. राहुल त्रिपाठी अवघ्या 5 धावा करून या सामन्यात बाद झाला. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये जरी राहुल तिसऱ्या क्रमांकावर खेळत आला असला, तरी गुरुवारी त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणे, हा मोठा धाडसाचाच निर्णय होता.
एमसीएस स्टेडियवर चेंडूल स्विंग होत होता आणि सलामीवीर ईशान किशन स्वस्तात बाद झाला. अशात हार्दिकच्या राहुल ऐवजी सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवू शकत होता. पण त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पहिला सामना खेळणाऱ्या राहुलला पाठवले. नवखा राहुल मात्र हे आव्हान पेलू शकला नाही आणि स्वस्तात बाद झाला. सूर्यकुमार अशा दबावाच्या परिस्थितीत यापूर्वी देखील खेळला आहे आणि तो या सामन्यात देखील तिसऱ्या क्रमांकावर चांगली खेळी करू शकत होता. हार्दिकच्या निर्णयावर देखील चाहते आणि जाणकार नाराजी व्यक्त करत आहेत.
हार्दिकची ‘ही’ गोष्टही खटकली
या तीन प्रमुख निर्णयांव्यतिरिक्त देखील एक गोष्ट होती, जी सर्वांना खटकली. हार्दिक मैदानात उपस्थित सहकाऱ्यांसोबत ज्या पद्धतीने वर्तन करत होता, ते पाहून अनेकांची मने दुखापली. संघाचा कर्णधार असल्याच्या नाते त्याने संघातील प्रत्येक खेळाडूशी संयमाने आणि मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. पण प्रत्यक्ष मैदानात असे काहीच होताना दिसले नाही. अनेकदा त्याची निराशा आणि राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. अशा गोष्टींमुळे संघातील इतर खेळाडूंचा आत्मविश्वास खालावतो आणि विरोधी संघ देखील या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत असतो. (team india paid price for three decisions of captain Hardik Pandya)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागील सात वर्षापासून भारत श्रीलंकेविरुद्ध विजय रथावर होता स्वार, पुण्यात घडला विचित्र योगायोग
अरे, भावा तू करतोय तरी काय! अर्शदीपच्या नो-बॉलमुळे भडकले टीम इंडियाचे चाहते, रिऍक्शनचा पाऊस