टी20 विश्वचषक 2024 मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया प्रथम बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचली. भारतीय संघाचे विमान दुपारी तीनच्या सुमारास दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास विस्तारा फ्लाइट क्रमांक ‘UK1845’ टीम इंडियाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले. या विमानाला विमानतळावर विशेष वागणूक देण्यात आली कारण खेळाडू बाहेर येण्यापूर्वी विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. टीम इंडियाच्या सन्मानार्थ दोन फायर इंजिन बंब विमानाच्या दोन्ही बाजूला उभे राहून पाणी फवारताना दिसले. वॉटर सॅल्यूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक कमेंटमध्ये भारतीय संघाबद्दल खूप आदरही दाखवत आहेत.
वॉटर सॅल्यूट म्हणजे काय?
विमानातील क्रू मेंबर्स, त्यात बसलेले लोक आणि त्या विमानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी वॉटर सॅल्यूट दिला जातो. कोणतीही विशेष कामगिरी किंवा विक्रम घडवल्याबद्दल, वॉटर सॅल्यूटद्वारे आदर दर्शविला जातो. भारतीय संघाने 2024 चा टी20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला असल्याने संघातील सर्व खेळाडूंना वॉटर सॅल्यूट देण्यात आला आहे.
Team India’s flight gets a water salute at airport… 💐♥️🙏 pic.twitter.com/nRuw4QmzUE
— Anshu Tiwari (@Anshu_amethibjp) July 4, 2024
मुंबई विमानतळावरून बाहेर आल्यानंतर टीम इंडियाला बसने मरीन ड्राइव्हवर नेण्यात आले. टीम इंडियाची विजयी परेड नरिमन पॉइंटपासून सुरू झाली. मरीन ड्राइव्हवर लाखो चाहत्यांच्या जमावात भारतीय संघ खुल्या बसमधून वानखेडे स्टेडियमवर पोहचला. टीम इंडियासाठी लोकांकडून जय हिंद, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या. भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचल्यावंतर बीसीसीआयकडून झाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
महत्तवाच्या बातम्या-
‘विक्ट्री परेड’ची सुरुवात कधी आणि कशी झाली? टीम इंडियाची पहिली विजय परेड कधी झाली होती?
बुमराहचा मुलगा मोदींच्या कडेवर, पंतप्रधानांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
थालाचा साधेपणा, धोनीनं या पध्दतीने साजरा केला आपल्या लग्नाचा वाढदिवस