---Advertisement---

बांगलादेशला चीत केलेल्या टीम इंडियाचा ठरला प्लॅन! फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘या’ संघाला देणार पाठिंबा

On: रविवार, डिसेंबर 18, 2022 7:15 PM
IND v BAN Test Siraj- Axar- KL Rahul_ Mehidy
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राममध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने रविवारी (18 डिसेंबर) 188 धावांनी विजय मिळवला. यामुळे पाहुण्या संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी या सामन्यात संघाचा कर्णधार म्हणून भूमिका बजावत असलेल्या केएल राहुल याने एक खास माहिती दिली आहे.

नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत नेतृत्व करताना राहुलने संघाला विजयापर्यंत नेले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी त्याला सध्या सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाबाबतीत प्रश्न विचारला गेला. भारतीय संघातील खेळाडू कोणाला पाठिंबा देत आहेत असे विचारल्यानंतर तो म्हणाला,

“संघातील खेळाडू ज्यांना पाठिंबा देत होते त्यातील बहुतांशी संघ बाहेर झाले आहेत. संघात सर्वात जास्त चाहते ब्राझील आणि इंग्लंडचे होते. आता हे दोन्ही संघ बाहेर गेल्याने कोण अर्जेंटिनाला आणि कोण फ्रान्सला पाठिंबा देणार हे माहीत नाही. आम्ही सायंकाळी एकत्र जेवण करू. त्यानंतर या अंतिम सामन्याचा आनंद लुटू.”

कतार येथे सुरू असलेल्या या फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना व फ्रान्स हे संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. दोन्ही संघांना तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी असेल. फ्रान्स सलग दुसऱ्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी खेळत आहे. 2018 विश्वचषकात त्यांनी विजेतेपद पटकावले होते. या अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होणार आहे. त्यामुळे त्याला विश्वचषकाची भेट देण्याचा अर्जेंटिना संघ प्रयत्न करेल.

(team india plans for fifa world cu final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अरे, त्याला बाहेरच बसवा’, भारताच्या दिग्गजाचे रोहितबाबत मोठे भाष्य
आयपीएलचा ‘फ्लॉप करोडपती’ गाजवतोय बिग बॅश! यंदाही ठेवलीये मालामाल होण्याची अपेक्षा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---