विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याचवेळी शिखर धवनच्या नेतृत्वात आणखी एक युवा भारतीय संघ श्रीलंकेत श्रीलंकेशी दोन हात करत आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारपासून (१८ जुलै) कोलंबो येथे सुरुवात झाली. या सामन्यात मैदानावर उतरताना भारतीय संघासोबत एक निराळी घटना घडली. भारतीय संघ तब्बल ६ वर्षानंतर प्रथमच आपल्या तीन दिग्गज खेळाडूंविणा मैदानात उतरत आहे.
या तिघांविणा उतरला भारतीय संघ
श्रीलंकेविरुद्धची मालिका खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वात व दिग्गज राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली युवा संघ श्रीलंकेत पाठवला आहे. कोरोना नियमावलीमधून बचावासाठी वरिष्ठ भारतीय संघाने श्रीलंकेत येण्याचे टाळले. त्यामुळे बीसीसीआयला हा युवा संघ श्रीलंकेत पाठवावा लागला.
कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात तब्बल सहा वर्षानंतर असे घडले की विराट कोहली, रोहित शर्मा व एमएस धोनी हे भारतासाठी मैदानात नाहीत. सध्या विराट व रोहित इंग्लंडमध्ये असून, धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे.
अखेरच्या वेळी झिम्बाब्वेविरूद्ध घडली होती घटना
भारतीय संघासाठी वनडे सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा व एमएस धोनी नसण्याची घटना अखेरच्या वेळी २०१५ झिंबाब्वे दौऱ्यावेळी घडली होती. या दौऱ्यावर बीसीसीआयने सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ झिम्बाब्वेला पाठवला होता. त्यावेळी झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने यजमान झिम्बाब्वेला ३-० अशी धूळ चारलेली.
पहिला वनडे सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), मनिष पांडे, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
संजू सॅमसनच्या पदार्पणाची चर्चा असूनही इशान किशनला का मिळाली संधी? कारण आले पुढे
ज्या वयात खेळाडू रिटायर होतात, त्या वयात शिखर धवनने कर्णधार व्हायचा विक्रम केलाय
लहान वयातच अनेकांसाठी आदर्श ठरलेली ‘सांगलीकर’ स्म्रीती मंधना






