ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारताचा संघ जाहीर झाला. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे, तर उपकर्णधार केएल राहुल आहे. भारताच्या मुख्य संघामध्ये 15 जणांचा सहभाग आहे, तर राखीव खेळाडूमध्ये चार खेळाडू आहेत. हे खेळाडू भारताला टी20 विश्वचषकाचा चॅम्पियन बनवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तर यातील खूप असे खेळाडू जे चॅम्पियन्स आहेत.
विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघातील काही खेळाडू आधीच चॅम्पियन ठरले आहेत. यामध्ये खुद्द कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भारताच्या विजेत्या 2007 टी20 विश्वचषकाचा भाग राहिला आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा तीन वेळा आयसीसी स्पर्धांचा चॅम्पियन ठरला आहे. त्याने कारकिर्दीत 2008मध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तर सध्याच्या विश्वचषकाच्या संघामध्ये कोणकोणते खेळाडू चॅम्पियन्स ठरले ती यादी पाहुया.
भारताच्या टी20 विश्वचषक 2022 संघात चॅम्पियन्सची भर
रोहित शर्मा – 2007 टी20 विश्वचषक, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी
विराट कोहली – 2008 19-वर्षाखालील विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी
दिनेश कार्तिक – 2007 टी20 विश्वचषक, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी
आर अश्विन – 2011 वनडे विश्वचषक, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी
भुवनेश्वर कुमार – 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी
अर्शदीप सिंग – 2018 19-वर्षाखालील विश्वचषक
टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (INDvsPAK) होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. तर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामन्याला दुपारी 1: 30 मिनिटांनी सुरूवात होणार आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आशिया चषकातील 5 खेळाडूंची हाकालपट्टी
राजस्थान रॉयल्सच्या फ्रॅंचायजीचा हेड कोच झाला जेपी डुमिनी, कोचिंग स्टाफची यादीही झाली जाहीर
एलिसा पेरीने तोडला विश्वविक्रम, ‘इतके’ किमी पळत येत डेविड वॉर्नरला केली बॉलिंग