भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्या दरम्यान सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मोहाली येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एक डाव व २२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर आता उभय संघांमध्ये बेंगलोर येथे मालिकेतील दुसरा व अखेरचा सामना खेळला जाईल. दिवस-रात्र (Bengaluru Day-Night Test) स्वरूपाच्या या सामन्यासाठी भारतीय संघ बेंगलोर येथे पोहोचला आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर याचा व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली.
बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
https://twitter.com/BCCI/status/1501846306788376581?t=h5kD7oQCVOfGJ-Z3SZbpXg&s=19
बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मोहाली ते बेंगलोर असा भारतीय संघाचा प्रवास दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडू प्रवासादरम्यान विमानात मजामस्ती करताना दिसून येत आहेत. बेंगलोरकडे रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाने मोहाली येथे गुलाबी चेंडूने सराव केला होता. दिवस-रात्र कसोटी ही गुलाबी चेंडूने खेळली जाते. भारतात होणारी ही केवळ दुसरी दिवस-रात्र कसोटी आहे. २०१९ मध्ये भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध भारतात पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता.
भारतीय संघाला क्लीन स्वीपची संधी
भारतीय संघाकडे या सामन्यात विजय मिळवून क्लीन स्वीप देण्याची सुवर्णसंधी असेल. रवींद्र जडेजा नायक राहिलेल्या मोहाली कसोटीत भारतीय संघाने शानदार विजय मिळवला होता. बेंगलोर कसोटीत भारतीय संघात जयंत यादव याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अथवा उमेश यादव यापैकी एकाला संधी देण्यात येऊ शकते. तर, फलंदाजी क्रमात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार).
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडीयाचे असे तीन खेळाडू, ज्यांना संपूर्ण कसोटी कारकिर्दीत शतक करण्यात आले अपयश (mahasports.in)