भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी२० सामना मंगळवारी (१४ जून) विशाखापट्टनम येथे खेळला जाणार आहे. डॉ व्हायएस राजशेखर रेड्डी स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला सांयकाळी ७ वाजता सुरूवात होणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत यजमान संघ २-०ने मागे आहेत. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला तिसरा सामना जिंकणे आवश्यक आहे. ही मालिका जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या सामना जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे.
हा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ विशाखापट्टनम येथे दाखल झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून व्हीडिओ शेयर केला आहे. या व्हीडिओमध्ये भारतीय खेळाडूंचे हार घालून स्वागत करण्यात आले. भारतीय खेळाडूंपैकी श्रेय्यस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि उमरान मलिक हे या व्हीडिओमध्ये दिसले आहेत.
Vizag – we are here! 👍 👍
See you in the Stadium tomorrow. 👏 👏#TeamIndia | #INDvSA | @Paytm pic.twitter.com/fQlamvOyHn
— BCCI (@BCCI) June 13, 2022
भारतीय संघ दिल्ली येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने पराभूत झाला होता. बाराबती स्टेडियम, कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताला ४ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते. यातच विशाखापट्टनम येथे होणारा तिसरा टी२० सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. या मालिकेतील चौथा सामना १७ जूनला राजकोट आणि १९ जुनला खेळला जाणारा पाचवा सामना बेंगलोर येथे खेळला जाणार आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजी उत्तम झाली होती, मात्र गोलंदाज लवकर विकेट्स घेण्यात अपयशी ठरले होते. दुसऱ्या टी२० मालिकेत भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजी करत ४ षटकांमध्ये १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची ही कामगिरी पाहता तिसऱ्या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या जिंकण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. फलंदाजीत सलामीवीर ऋतुराज सलग दुसऱ्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरल्याने भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
पहिल्या सामन्यात दिनेश कार्तिकने दोनच चेंडू खेळले होते. दुसऱ्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि कर्णधार-यष्टीरक्षक रिषभ पंत लवकर बाद झाल्यावर त्याला अधिक चेंडू खेळण्याची संधी मिळाली. याचा फायदा घेत त्याने फिनीशरची भुमिका पार पाडत २१ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत ३० धावा केल्या होत्या. यामुळे भारताने २० षटकात ६ विकेट्स गमावत १४८ धावा केल्या होत्या. कुमारच्या गोलंदाजीनेसुद्धा भारताने हा सामना ४ विकेट्सने गमावला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कर्णधार’ पंत ऑन द फिल्ड निर्णय घेण्यात पडतोय कमी, दुसऱ्या टी२०तील ‘त्या’ चुकीमुळे नेहरा नाराज
विश्वचषकात ‘तू चल मी आलो’चा प्रसंग, इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या ४५ धावांवर गुंडाळला होता डाव
तिसऱ्या टी२० सामन्यांत भारतीय संघात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल संघाची ‘प्लेइंग ११’