राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्याची घोषणा झाली तेव्हा भारतीय चाहत्यांना खूप आनंद झाला. चाहत्यांना वाटत होते की, गंभीरच्या कार्यकाळात टीम इंडिया अनेक मोठे पराक्रम करेल. पण असं म्हणतात की माणसाला जे वाटतं तेच होईल असं नाही. गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाचा आलेख वर जाण्याऐवजी खाली येत आहे. गंभीरच्या कार्यकाळात टीम इंडियाला गेल्या 6 महिन्यात अनेकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. गंभीरच्या कार्यकाळात टीम इंडियाने केलेल्या त्या 18 अवांछित विक्रमांबद्दल जाणून घेऊया.
1. रोहित शर्मा आणि कंपनीने 27 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका त्यांच्या भूमीवर गमावली. या मालिकेत श्रीलंकेने टीम इंडियाचा 2-0 असा पराभव केला होता.
2. या एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय सर्वबाद झाले. टीम इंडियाच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच 30 विकेट पडल्या.
3. या वर्षी भारतीय क्रिकेट संघ एकही एकदिवसीय सामना जिंकू शकला नाही. 45 वर्षांनंतर कॅलेंडर वर्षात संघाला एकही एकदिवसीय सामना जिंकता आला नाही.
4. यावर्षी न्यूझीलंड विरुद्ध बेंगळुरू येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अवघ्या 46 धावांत गारद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टीम इंडिया घरच्या मैदानावर इतक्या कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाली.
5. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा आशियातील पहिला संघ ठरला.
6. टीम इंडिया बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 19 वर्षांनंतर कसोटी सामना हरली.
7. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 12 वर्षांनंतर भारतीय संघ कसोटी सामन्यात हरला.
8. 36 वर्षांनंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली.
9. टीम इंडियाची 24 वर्षांनंतर घरच्या कसोटी मालिकेत व्हाईट वॉश झाली.
10. टीम इंडियाने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर 3 सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने गमावली.
11. 12 वर्षांनंतर भारतीय संघाने मायदेशात कसोटी मालिका गमावली.
12. 41 वर्षांनंतर टीम इंडियाने एका वर्षात 4 कसोटी सामने गमावले.
13. टीम इंडियाने 6 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामना गमावला.
14. 10 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.
15. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टीम इंडिया 13 वर्षांनी टेस्ट मॅच हरली.
16. टीम इंडियाला 10 वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे.
हेही वाचा-
IND vs AUS; यशस्वी जयस्वाल नाबाद होता! बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला उघड पाठिंबा
IND vs AUS: विराट कोहली-रोहित शर्मा निवृत्त होणार! माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
पॅट कमिन्स इतिहास रचण्यापासून एक विजय दूर, 2 वर्षात चौथे मोठे विजेतेपद उंचावणार