भारतीय संघ घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील ही लढत 19 सप्टेंबरपासून पाहायला मिळणार आहे. बांगलादेशने शेवटच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. तत्पूर्वी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
भारत विरुद्ध बांगलादेश, पहिला कसोटी सामना (19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर)
भारत विरुद्ध बांगलादेश, दुसरा कसोटी सामना (27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर)
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-5 खेळाडू
ENG vs SL: जो रूट घालतोय धुमाकूळ, दिग्गजाला मागे टाकून केला नवा रेकाॅर्ड
“धोनीने आयुष्यभर क्रिकेट खेळत राहावे”, सीएसकेच्या युवा गोलंदाजाचे मन जिंकणारे वक्तव्य