---Advertisement---

‘गिल-पंत’ युगाची सुरुवात! इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर!!

On: शनिवार, मे 24, 2025 2:02 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने आज इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली असून, शुबमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रिषभ पंत उपकर्णधार आणि प्रमुख विकेटकीपर म्हणून संघात परतला आहे. (SHUBMAN GILL: NEW TEST CAPTAIN OF TEAM INDIA)

बीसीसीआयने घेतलेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंड दाैऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड दाैऱ्यासाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे-

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया! TEAM INDIA SQUAD FOR ENGLAND TOUR 2025

शुबमन गील (कर्णधार)
रिषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर)
यशस्वी जयस्वाल
केएल राहूल
साई सुदर्शन
अभिमन्यू ईश्वरन
करुण नायर
नितीश कुमार रेड्डी
रविंद्र जडेजा
ध्रुव ज्युरेल (विकेटकीपर)
वॅाशिंग्टन सुंदर
शार्दुल ठाकूर
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
प्रसिद क्रिष्णा
आकाश दीप
अर्शदीप सिंग
कुलदीप यादव

बीसीसीआयने निवडलेल्या या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्यात आला आहे. आयपीएल 2025 मध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या शुबमन गिलच्या नेतृत्वात भारत हा दौरा गाजवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय गिलचा कॅप्टन म्हणून हा पहिलाच कसोटी दौरा असून, पंतची पुनरागमनानंतर थेट उपकर्णधार म्हणून निवड देखील मोठा संकेत देणारी आहे. (Rishabh Pant Voice Captain Of Test Team)

भारताचा इंग्लंड दाैरा 2025 (Team india Schedule For England Tour)

पहिला कसोटी सामना – 20-24 जून 2025, हेडिंग्ले
दुसरा कसोटी सामना – 2-6 जुलै 2025, एजबॅस्टन
तिसरा कसोटी सामना- 10-14 जुलै 2025, लाॅर्ड्स
चाैथा कसोटी सामना- 23-27 जुलै 2025, मँचेस्टर
पाचवा कसोटी सामना- 31 जुलै ते 4 ऑगस्ट, ओव्हल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---