श्रीलंका दाैऱ्यावर असलेल्या भारतीय संघ काल 27 जुलै आपल्या टी20 मालिकेला सुरुवात केला. पहिल्याच टी20 सामन्यात टीम इंडियाने यजमानसंघचा 43 धावांनी पराभव केला. आणि तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आणि गाैतम गंभीच्या प्रशिक्षकात टीम इंडियाच्या नव्या पर्वाला विजायाने सुरुवात झाली.
वास्तविक, टी20 विश्वचषक 2024 च्या टीम इंडियाच्या यशामध्ये सिंहाचा नसला तरी खारीचा वाटा देणार शिवम दुबेला संघात श्रीलंका विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बाहेर बसावे लागले आहे. शिवमला प्लेइंग 11 मध्ये संघात स्थान मिळवत आले नाही. खरे तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुबेने टी20 विश्वचषकातील सर्व सामने खेळला होता. त्यानंतर झिम्बाब्वे विरुद्ध मालिकेसाठी त्याची शेवटच्या तीन सामन्यात संघात खेळण्याची संधी मिळाली होती. आलिकडेच निवड झालेल्या नवनिर्वाचित कर्णधार आणि हेड कोचच्या नियुक्तीनंतर शिवम दुबेला संघात स्थान मिळाले नाही. अशी सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पण अद्याप अधिकृतपणे या मुद्यावर कोणतीही माहिती समोर आलेले नाही.
श्रीलंका दाैऱ्याबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघ 3 टी20 सामने आणि तेवढ्याच एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे. तर एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच कर्णधारपद सांभाळणार आहे. मालिकेतील दुसरा टी20 सामना आज (28 जुलै) तर शेवटचा टी20 सामना 30 जुलै रोजी होईल. तर 3 एकदिवसीय सामने 2,4 आणि 7 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
शिवम दुबेच्या टी20 कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास त्याने 35 टी20 सामन्यात 23 डावांमध्ये 136 च्या स्ट्राईक रेटने 435 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 3 अर्धशतके ठोकल्या आहेत. या फाॅरमॅटमध्ये 63* ही त्याची सर्वोच धावसंख्या आहे. तर तेवढ्याच डावात त्याने गोलंदाजी करताना 11 विकेट्स मिळवल्या आहेत. ज्यामध्ये त्यातची सर्वोच्च कामगिरी 3/30 आहे.
हेही वाचा-
अफगाणिस्तान भारतात खेळणार कसोटी सामना, तारीख आणि मैदान ठरलं
सूर्याच्या नेतृत्वाबद्दल ‘या’ खेळाडूनं केलं मोठं वक्तव्य! म्हणाला, “जर कर्णधार तुम्हाला…”
कसोटीमध्ये सर्वात जलद 12,000 धावा करणारे टॉप 3 खेळाडू, पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा दिग्गज