भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर ही प्रतिष्ठेची लढत खेळली जाईल. या अंतिम लढतीसाठी भारतीय खेळाडू तीन टप्प्यात इंग्लंडला पोहोचत आहेत. आतापर्यंत दोन टप्प्यात खेळाडू तिथे पोहोचले असून, आयपीएलचा अंतिम सामना खेळल्यानंतर उर्वरित खेळाडू बुधवारी (31 मे) लंडन येथे पोहोचतील. तत्पूर्वी, याआधी इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या खेळाडूंनी सरावाला देखील सुरुवात केली आहे.
https://www.instagram.com/p/Cs00qlON-U5/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
सध्या लंडनमधील ओरूंडेल वेस्ट ससेक्स या मैदानावर भारतीय संघ सराव करत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या अनुभवी खेळाडूंसह ईशान किशन, अक्षर पटेल व यशस्वी जयस्वाल या सराव सत्रात दिसून आले.
दोन वर्षाच्या सायकलनंतर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेला भारत व द्वितीय क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया हे या लढतीत आमने-सामने येथील. यापूर्वी झालेल्या पहिल्या सायकलमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले होते. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजेतेपदाची अपेक्षा बाळगून आहे. तर दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळताना मानाची गदा उंचावू इच्छिते.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव
(Team India Starts Practice For WTC Final In England Rohit Virat Attend Practice Session)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लाज वाटते तू भारतरत्न असल्याची’, कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी निखिल वागळेंची सचिनवर जहरी टीका
सीएसकेच्या यशामागील खरा चाणक्य! 16 वर्षांपासून सुपर किंग्सला वाट दाखवणारा ‘सुपर कोच’ फ्लेमिंग