---Advertisement---

श्रीलंकेला गेलेल्या ‘यंगिस्तान’च्या पहिल्या ट्रेनिंग सेशनचा व्हिडिओ व्हायरल, प्रशिक्षकाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

On: शनिवार, जुलै 3, 2021 7:01 PM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्यासाठी पोहोचला आहे. दौरा सुरू होण्यास १० दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच, क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर भारतीय संघ आपल्या पहिल्या सराव सत्रासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाच्या या पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शेअर केला असून, संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडूंच्या तयारीविषयी माहिती दिली.

बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघ मुंबई येथे १४ दिवस क्वारंटाईन होता. त्यानंतर श्रीलंकेत पोहोचल्यावर संघाला तीन दिवस क्वारंटाईन व्हावे लागले. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय संघ शुक्रवारी (२ जुलै) पहिल्या सराव सत्रासाठी मैदानावर उतरला.

भारतीय संघाच्या या सराव सत्राचा एक व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवरून शेअर केला. यामध्ये खेळाडू फुटबॉल खेळताना, स्विमींग करताना तसेच जॉगिंग, स्ट्रेचींग व हलका फुलका व्यायाम करताना दिसत आहेत. व्हिडिओत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड बोलताना दिसतायेत.

ते म्हणाले, “खेळाडू १८ दिवस क्वारंटाईन राहून कंटाळले होते. त्यामुळे या सर्वांनाच सरावाऐवजी वातावरणात एकरूप होण्याची संधी देण्यात आली.” या व्हिडिओमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्या व फलंदाज सूर्यकुमार यादव हे देखील संभाषण करताना दिसत आहेत.

असा असेल श्रीलंका दौरा
शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघ श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. १३ जुलैपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होईल. त्यानंतर तीन टी२० सामन्यांची मालिका खैळली जाईल. दौऱ्यावरील सर्व सामने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील. राहुल द्रविड हे देखील प्रथमच भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पडतील.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतातील ‘या’ शहरात बनणार जगातील तिसरे सर्वात मोठे स्टेडियम, खर्चाची किंमत ऐकून उंचावतील भुवया

आनंदाची बातमी! बीसीसीआयने केली देशांतर्गत हंगामाची घोषणा, ‘या’ दिवशी होणार सुरुवात

सहकाऱ्याकडून कोहलीची स्तुती; म्हणे, ‘इतर खेळाडू १०० टक्के देतात, पण तो २०० टक्केच्या प्रयत्नात असतो’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---